शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

वैतरणा नदीत अडकलेल्या जीएम इन्फ्रास्ट्रक्चरच्या 10 कामगारांना वाचवविण्यात एनडीआरएफच्या टीमला यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 6:01 PM

पहाटे पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि  समुद्राला आलेली ओहोटी ह्यामुळे नदीचा प्रवाह कमी झाल्या नंतर नदीत एनडीआरएफने बोटीच्या सहाय्याने १६ तास अडकून पडलेल्या १० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले.

हितेंन नाईक -पालघर- पालघरच्या वैतरणा नदीत अडकलेल्या जीएम इन्फ्रास्ट्रक्चरच्या 10 कामगारांना वाचवविण्यात एनडीआरएफच्या टीमला अखेर यश आले. रात्री मुसळधार पावसाचा कमी झालेला जोर आणि समुद्राला लागलेल्या ओहोटीमुळे नदीचा प्रवाह कमी झाल्याने एन डी आरएफच्या टीमचे काम सुलभ झाले आणि १६ तासापासून नदीच्या प्रवाहात अडकून पडलेल्या कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले.

मुंबई वडोदरा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील काही वर्षभरापासून सुरू असून ह्या कामाचा ठेका घेतलेल्या जीएम इन्फ्रास्ट्रक्चरने मोठा प्रोजेक्ट् बहाडोली गावात उभारला आहे. बहाडोली गावाच्या पूर्वेला असलेल्या वैतरणा नदीत पूल उभारण्यासाठी पिलर उभारण्याचे काम, मुसळधार पाऊस आणि नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला असताना ही धोकादायक रित्या सुरूच होते. कामगारांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना जीएम कंपनीच्या व्यवस्थापकांनी १० कामगारांना नदीच्या धोकादायक प्रवाहात लोटून दिले होते.

जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नदी-नाल्याना पूर आला असून अनेक लोक अडकून पडले आहेत. जिल्ह्यातील अनेक धरणे भरली असून त्यातून लाखो क्युमेंक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे. अशा वेळी कामगारांच्या जीविताची काळजी न घेता त्यांना धोकादायक परिस्थितीत नदीत उतरविण्याची जोखीम ह्या १० कामगारांच्या जीविताला धोका निर्माण करणारी ठरली होती.

बुधवारी रात्री मुंबईच्या कोस्ट गार्डकडे नदीत फसलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरची मागितलेली मदत मुसळधार पाऊस, रात्रीची घटना आणि नदीच्या धोकादायक प्रवाहामुळे शक्य नसल्याचे कोस्टगार्डने कळविले होते. दुसरीकडे एन डी आरएफकडे असलेल्या साधन सामग्रीच्या मर्यादा लक्षात घेता रात्रभर सुरू असलेले प्रयत्न अपुरे पडत होते. स्थानिक मच्छीमाराच्या बोटीची मदत ही धोकादायक परिस्थिती मुळे उपलब्ध होऊ शकत नसल्याने अखेर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, उपजिल्हाधिकारी सुरेंद्र नवले, प्रांत अधिकारी धनाजी तोरस्कर, तहसीलदार सुनिल शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीता पाडवी ह्यांनी घटनास्थळाकडे धाव घेत व्यवस्था उभारण्याच्या सूचना दिल्या. पहाटे पावसाचे कमी झालेले प्रमाण आणि  समुद्राला आलेली ओहोटी ह्यामुळे नदीचा प्रवाह कमी झाल्या नंतर नदीत एनडीआरएफने बोटीच्या सहाय्याने १६ तास अडकून पडलेल्या १० कामगारांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळाले. ह्यावेळी स्थानिक पोलिसांचे सहकार्य ही महत्वपूर्ण ठरले. 

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरारNational Disaster Response Forceराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल