शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या ‘सेफ्टी ऑडिट’ची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2022 5:03 PM

मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही वर्षांत अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पालघर जिल्ह्यात अपघातप्रवण क्षेत्रातील अपघातांची संख्या काही पटीने अधिक असल्याचे दिसून आलेले आहे. 

जगदीश भोवड -वसई : उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या पालघर-चारोटी येथे रविवारी झालेल्या अपघाती निधनाने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातांची भीषणता पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे. गेल्या वर्षभरात कासा पोलीस स्टेशनअंतर्गत जवळपास १६८ अपघात झालेले आहेत. अन्य भागांतील आकडेवारीही यापेक्षा कमी नाही. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाची रचना, रस्त्यावरील वाहतुकीचा ताण व त्यात अपेक्षित असलेल्या आवश्यक सुधारणा लक्षात घेऊन या रस्त्याचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही वर्षांत अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पालघर जिल्ह्यात अपघातप्रवण क्षेत्रातील अपघातांची संख्या काही पटीने अधिक असल्याचे दिसून आलेले आहे. 

वसई, नालासोपारा व विरार फाटा या प्रवेश मार्गांवर नेहमीच वाहतूक कोंडी व अपघात होत असतात. यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. तसेच महामार्गावरील खड्डे कायमस्वरूपी बुजवून महामार्गाजवळ होणाऱ्या अनधिकृत पार्किंगवर तातडीने मार्ग काढायला हवा.     - पंकज देशमुख, जिल्हाप्रमुख, शिवसेना, पालघर.

याकडे सरकार लक्ष देणार का?- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय  महामार्गावरील मेंढवण, सोमटा, तवा, चारोटी, महालक्ष्मी, धनिवरी, आंबोली या भागांमध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे. - महामार्गावर बंद  पडलेली व अपघातग्रस्त वाहने हटवण्यासाठी आवश्यक यंत्रणेचा अभाव आहे. - पाणी निचरा होण्याचे मार्ग बंद झालेले आहेत. पथदिवे बंद असतात. अपघात रोखण्यासाठीच्या कोणत्याच उपाययोजना करण्यात येत नसल्याने महामार्ग समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे.

सहाऐवजी काही ठिकाणी चारच मार्गिकानिविदेत सहा मार्गिका अंतर्भूत असताना प्रत्यक्षात मात्र काही ठिकाणी चार मार्गिका आहेत. आवश्यक त्या ठिकाणी रंबलर्स, कॅट आईज, धोक्याची सूचना देणारे फलक, वेगमर्यादा दर्शवणारे फलक, रिफ्लेक्टर तसेच ५०, १००, २०० मीटरवर झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या तसेच किलोमीटर दर्शक फलक अशा उपाययोजना करणे गरजेचे असताना आवश्यक उपाययोजना करण्याकडे प्राधिकरणाने पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे या महामार्गाची रचना, रस्त्यावरील वाहतुकीचा ताण व आवश्यक सुधारणा लक्षात घेऊन या रस्त्याचे ‘सेफ्टी ऑडिट’ करणे गरजेचे असल्याचे मत अनेकजण व्यक्त करीत आहेत.  

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMumbaiमुंबई