शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
3
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
4
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
5
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
6
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
7
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
8
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
9
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
10
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
11
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
12
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
13
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
14
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
15
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
16
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
17
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
18
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
19
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
20
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले

दोन आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती वापरा अभावी पडून

By admin | Published: February 23, 2017 5:26 AM

तालुक्यात नवीन सहा उपकेंद्रे सुरू करण्याच्या प्रस्तावानुसार मुँह खु, व शेवता गावात बांधलेल्या

विक्रमगड : तालुक्यात नवीन सहा उपकेंद्रे सुरू करण्याच्या प्रस्तावानुसार मुँह खु, व शेवता गावात बांधलेल्या नवीन इमारती गेली सहा महिने उद्घाटनाअभावी पडून आहेत. जांभा गावात उपकेंद्राची इमारत बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागाकडून ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार सुरू आहे. असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून विक्र मगड तालुक्यातील दादडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व जांभा, मुहू.बु, सावरोली, डोल्हारी.बु या ठिकाणी आरोग्य उपकेंद्रांना दोन वर्षा पूर्वी मंजुरी मिळाली आहे. परंतु, ही प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्र अजूनही सुरु झालेली नाहीत त्यामुळे ती कधी चालू होणार असा सवाल या गावातील नागरिक करत आहेत.आदिवासी भागातील रुग्णांसाठी विक्र मगड तालुक्यात एकाच ग्रामीण रु ग्णालय असल्याने आरोग्य सेवेचा सर्व भार त्यावर येतो. रोजचे २५० ते ३०० बाह्य रु ग्ण येत असल्याने त्यांना तासन्तास प्रतिक्षा करावी लागते. जर ही उपकेंद्रे सुरू झाली तर रुग्णांची पायपीट आणि प्रतिक्षा वाचेल. तालुक्यात विक्र मगड येथे एक ग्रामीण रु ग्णालय, मलवाडा, तलवाडा, कुरंजे येथे प्राथमिक रु ग्णालय व २३ उपकेंदे्र आहेत. तालुक्यांची लोकसंख्या जवळ जवळ दीड लाखाच्यावर गेल्याने या सहा केंद्रांचा आरोग्य विभागाकडून प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्या नुसार या त्यांना या पूर्वीच मंजूर मिळाली आहे. परंतु ती सुरू झालेली नाहीत. (वार्ताहर)सर्वच केंद्रांमध्ये रिक्त पदांची समस्याच्प्राथामिक आरोग्य केंद्र - तलवाडा - वैद्यकीय अधिकारी गट-अ, वैद्यकीय अधिकारी गट ब, औषध निर्माता, वाहनचालक, सफाई कामगार, आरोग्य सेविका अशी प्रत्येकी एक पदे रिक्त आहेत. तर शिपायांची ४ पदे रिक्त आहेत.च्प्राथामिक आरोग्य केंद्र मलवाडा: वैद्यकीय अधिकारी गट, औषधनिर्माता, आरोग्य सहाय्यक स्त्री , वाहनचालक, सफाई कामगार असे प्रत्येकी १ पद रिक्त आहे. तर शिपायांची ४ पदे रिक्त आहेतच्कुरंजे प्राथमिक आरोग्य केंद्र : वैद्यकीय अधिकारी गट- ब, सफाई कामगार यांचे एक पद रिक्त आहे. आरोग्य सेवक, शिपाई यांची दोन पदे रिक्त आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र कुरंजे, तलवाडा, मलवाडा व आरोग्य पथके तळवली, बोरांडा य ठिकाणी १० पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागात कनिष्ठ सहाय्यकची ४ तर वाहन चालकाची २ पदे रिक्त आहेत.आरोग्य केंद्र मंजूरदादडे येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली आहे. त्या दृष्टीने जागा उपलब्ध झाली असून ते लवकरात लवकर चालू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ.रीतेश पटेल यांनी दिली.मंजूर आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे सुरु करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला असून पदे भरल्यानंतर ती लवकरच चालू होतील- डॉ. रीतेश पटेल, आरोग्य अधिकारी प.स.विक्र मगड