- हितेन नाईक पालघर : पानेरी नदीच्याप्रदूषणाची गंभीरता दिवसेंदिवस वाढत असून प्रदूषण करणाऱ्या कंपन्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलने करूनही कारवाई होत नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास मोरे यांनी दिलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ७ डिसेंबर रोजी बोलाविलेल्या सर्वसंबंधितांच्या बैठकीस तहसीलदारांनीच दांडी मारल्याने ही बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे या मुद्द्यावरून आता वातावरण तापण्याची शक्यता आहे.हजारो बागायतदार आणि मच्छीमारांच्या आर्थिक स्तोत्रात महत्वपूर्ण भूमिका बजावणारी पानेरी नदी पालघर नगर परिषद आणि काही कारखान्यांतून होणाºया प्रदूषणामुळे काळवंडली आहे. मागील ८-१० वर्षांपूर्वी पानेरी वाचविण्याची हाक देत वडराई, माहीम मधील हजारो स्थानिक नागरिकांनी पानेरी वाचवा संघर्ष समितीच्यावतीने तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण ही केले होते. त्यावेळी अनेक लोकप्रतिनिधींसह तत्कालीन अधिकाºयांनी दिलेल्या लिखित आश्वासनांची पूर्तता अद्यापही झालेली नाही मात्र नगरपरिषदेच्या गटारगंगेसह काही कारखानदारांनी आपले प्रदूषित पाण्याचे पाइप थेट नदी-नाल्यात सोडायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे कुठल्याही विभागाची परवानगी न घेता काही कारखानदारांनी बेकायदेशीररित्या कंपनी उभारून तिचे प्रदूषित पाणी सरळ पानेरी नदीत सोडून प्रदूषण करीत आहेत. त्याचे पुरावे सादर करून कारवाई करण्याची मागणी वर्षभरा पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे केली होती. मात्र या बाबातचा अर्ज खालच्या कार्यालयात इकडून तिकडे आजही फिरत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि त्याचे इतर विभाग प्रदूषण करणाºया कंपन्यांवर कारवाई करण्याबाबत काणाडोळा करीत असल्याचे स्पष्ट होते आहे. या प्रदूषणाचे दिवसेंदिवस वाढत असून पालघर नगर परिषदेचे सांडपाणी आणि बिडको औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांतील प्रदूषित, रासायनिक सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता छोट्या नाल्यात, पानेरी नदी मध्ये सोडण्यात येत आहे. त्यामुळे या नदीच्या आजूबाजूला राहणाºया गाव पाड्यातील लोकांना नानाविध त्वचा रोग, दमा, कॅन्सर सारख्या गंभीर आजारांची लागण झालेली आहे. तर हे प्रदूषित पाणी वडराई च्या खाडीतून थेट समुद्रात जात असल्याने खाडीतील माशांसोबतच तेथील जैव विविधता नष्ट होऊ लागली आहे.ह्या गंभीर बाबींची दखल तक्रारी आणि आंदोलने करूनही घेतली जात नसल्याने शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास मोरे ह्यांनी ५ नोव्हेंबर रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाºयांना आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या अनुषंगाने तहसीलदारांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळासह नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, मायक्रोबार, तुरखीया टेक्स्टाईल, आॅस्टिनिक स्टील, वेलस्पन, शिवा पेट्रोझन्सि, सॅफेक्स फायर सर्व्हिस, निशांत अरोमॅक्स, ड्युरीअन, गोल्डन सर्जिकल, हिंदुस्थान लॅबोटरीज, जयश्री केमिकल कंपन्यांना शुक्रवारी ७ डिसेंबर रोजी कागदपत्रांसह बैठकीला उपस्थित राहण्याबाबत कळविले होते. तालुकाध्यक्ष मोरे, कंपनी प्रतिनिधी, आदी अधिकारी बैठकीसाठी असतांना तहसीलदार नसल्याने ही बैठक रद्द करण्यात आल्याने शिवसेना संतप्त आहे.बहाडोली आणि इतर भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्याने अचानक कारवाईसाठी जावे लागले.पानेरी संदर्भात तात्काळ ह्या आठवड्यात बैठक घेऊन उपाय योजना आखू.- महेश सागर, तहसीलदार,
पानेरी नदीच्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 11:03 PM