- हितेन नाईक पालघर : पालघर-माहीम बायपास मार्गावर धोकादायक अवस्थेत असलेले विजेचे खांब हलविण्यात नगर पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनांसाठी जीवघेणे ठरणारे हे खांब तात्काळ हटविण्याची मागणी भाजयुमोचे अध्यक्ष समीर पाटील यांनी केली आहे.पालघर माहीम रोड वरील वळण नाका, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते चार रस्ता या रस्त्याचे चौपदीकरण झाल्यानंतर पालघर नगरपरिषदेने आपल्या स्वत:च्या मालकीचे स्ट्रीट लाईट या रस्त्यावर उभारले. त्यामुळे महावितरणचे असलेले व सध्या निकामी ठरलेले ३२ खांब तात्काळ हटविणे गरजेचे असतांना वर्षभरापासून हे धोकादायक खांब अजूनही उभे आहेत. नगरपरिषदेने हे खांब बाजूला सारून नंतरच ठेकेदाराकडून रस्त्याच्या चौपदीकरणाचे काम करून घेणे गरजेचे असताना पालिकेच्या निष्काळजीपणामुळे आजही हे खांब उभे आहेत. या खांबांचा अंदाज चालकांना येत नसल्याने छोटेमोठे अपघात घडले आहेत.>वापर नाही तरीही धोकादायक स्थितीत उभेया विद्युत खांबांची उभारणी जरी महावितरणने केली असली तरी त्यावर मालकी नगर परिषदेची आहे. त्यामुळे तिने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ पावले उचलून हे धोकादायक खांब तात्काळ हटविणे गरजेचे आहे. त्यांनी हे खांब हटविण्याचे शुल्क महावितरणकडे जमा केल्यास तात्काळ हे खांब हलविण्यात येतील असे एका महावितरणच्या अधिकाऱ्याने लोकमतशी बोलतांना सांगितले.धोकादायक असलेले हे खांब बदलण्याबाबत मागील पाच महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहोत. मात्र नगरपालिका आणि महावितरण याकडे दुर्लक्ष करीत आहे.- समीर वर्तक, भाजयुमो अध्यक्ष
विजेच्या घातक खांबांकडे पालघर पालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 2:44 AM