नालासोपारा : वसई-विरारमध्ये मागील काही गुन्ह्यांच्या उकलीबाबत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. याबाबत वसई पोलिसांनी २०१८ साली ‘एक कॅमेरा शहरासाठी’ राबविण्यात आलेली संकल्पना आता खरोखरच पोलिसांना फायदेशीर ठरत आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस प्रशासनाचे मुख्य शस्त्र बनले आहे. पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे तयार केले आहे. वसईच्या सातही पोलीस ठाण्यांनी आतापर्यंत रस्त्यावर तब्बल एक हजार ४९ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. पुरेसा फौजफाटा पोलीस ठाण्यात नसल्याने गुन्हेगारी रोखण्यात अपयश आले असले तरी पोलीस कर्मचाऱ्यांची कमी हे सीसीटीव्ही कॅमेरे भरून काढत आहेत.वसई-विरार शहरातील पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हेगारीचा ग्राफ बघता २०१८ साली वसईचे तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘एक कॅमेरा शहरासाठी’ ही मोहीम सुरू केली होती. दरम्यान, लॉकडाऊननंतर गुन्हेगारीचा ग्राफ वाढायला लागला असल्याने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आयुक्त सदानंद दाते यांच्या आदेशानुसार सर्वच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत आहेत.मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने एक कॅमेरा शहरासाठी ही संकल्पना तुळींज, विरार, वालीव, माणिकपूर, वसई, अर्नाळा आणि नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राबविण्यात आली आहे. आतापर्यंत वसई तालुक्यातील सातही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मुख्य रस्त्यांवर, नाक्यावर, गर्दीच्या ठिकाणी आतापर्यंत तब्बल एक हजार ४९ कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी व गुन्ह्यांची उकल होण्यासाठी बऱ्यापैकी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत पोलीस ठाण्यांना मिळणार आहे. - संजयकुमार पाटील, पोलीस उपायुक्त, झोन-२ वसई-विरारमध्ये ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, त्यांचे पोलीस ठाण्यातून मॉनिटर ऑपरेट करण्यात येणार आहेत. यामुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणाऱ्या गुन्हेगारी घटनांबाबत बरीचशी मदत मिळणार आहे.- प्रशांत वाघुंडे, पोलीस उपायुक्त, झोन-३, विरार परिमंडळकोणत्या ठिकाणी किती कॅमेरेतुळींज पोलीस ठाणे १९४विरार पोलीस ठाणे १११अर्नाळा पोलीस ठाणे १३८नालासोपारा पोलीस ठाणे १०५माणिकपूर पोलीस ठाणे १७४वसई पोलीस ठाणे १२५वालीव पोलीस ठाणे २०२
वसईमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 1:57 AM