शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

भरवादळात ‘गंगा’ने वाचवली न्यू धवल

By admin | Published: August 07, 2016 3:35 AM

सातपाटी बंदरातून मासेमारी साठी गेलेली न्यूधवल ही नौका १४ खलाशांसह तुफानी वादळ, वाऱ्यामध्ये खोल समुद्रात तीन दिवसा पासून बंद अवस्थेत अडकून पडलेली होती.

- हितेन नाईक, पालघर

पालघर : सातपाटी बंदरातून मासेमारी साठी गेलेली न्यूधवल ही नौका १४ खलाशांसह तुफानी वादळ, वाऱ्यामध्ये खोल समुद्रात तीन दिवसा पासून बंद अवस्थेत अडकून पडलेली होती. कोस्ट गार्ड ही समुद्राचे रौद्र रूप पाहून वेळीच मदतीसाठी धाव घेत नसताना, मच्छीमारांच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या अनिल चौधरी यांनी आपल्या सात साथीदारासह हरहर गंगा ही नौका समुद्रात उतरवून त्या संकटग्रस्त नौकेसह १४ खलाशांना किनाऱ्यावर सुखरूप आणण्यात यश मिळविले. गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून नदी, नाले, धरण, भरभरून वाहत असताना समुद्रानेही रौद्र रूप धारण केले होते. ह्या ओढवलेल्या प्रलयाने सर्वत्र एकच हाहा:कार माजला होता. या प्रलयकारी वातावरणा मध्ये मदतकार्य पोहचविण्यासाठी प्रशासनही प्रयत्न करीत होते तरी या निसर्गाच्या रु द्रावतारा पुढे ते कमी पडत असल्याचे दिसून येत होते. ४ आॅगस्टपासून पावसाळी बंदी कालावधी संपून मासेमारीला परवानगी मिळाल्या नंतर मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील नौका समुद्रात जाऊ शकल्या नव्हत्या. समुद्र खवळलेला असल्याने माशांचे एकत्र फिरणारे थवे आपापल्या जाळ्यात पकडण्यासाठी सर्वच मच्छीमाराचे हात शिवशिवत होते. परंतु समद्रात उसळणाऱ्या महाकाय लाटा आणि वादळी वाऱ्यामुळे वातावरण शांत होण्याची वाट मच्छीमार पाहत होते. गुरूवारी वातावरण थोडे शांत झाल्या नंतर दुपारी ‘न्यू धवल’ नौकेसह अन्य ९ नौका मासेमारी साठी निघाल्या. समुद्रात ८ ते ९ नॉटिकल गेल्यावर न्यू धवल ही नौका रात्री इंजिन नादुरुस्त झाल्याने बंद पडली. तसा निरोप वायरलेस सेटद्वारे मालक धनजी मेहेर याना दिल्या नंतर त्यांचा संपर्क तुटला.त्यामुळे त्यांच्या घरासह गावात चिंतेचे वातावरण पसरले. त्यातच हवामान खात्याने मच्छीमारांनी समुद्रात मासेमारिला जाऊ नये असा इशारा दिल्याने सर्वांच्या चिंतेत वाढ झाली. गुरुवारी रात्रीपासून इंजिन बंद पडलेल्या नौकेची बॅटरी ही उतरल्याने न्यू धवल नौकेचा सर्वांशी संपर्क तुटला होता. अशा वेळी नौकेवरील लोयली (अँकर) समुद्रात टाकून सर्व लोक २ दिवस उपाशी तापाशी देवांचा धावा करीत पडून होते. चंदू नावाचा खलाशी आजारी पडल्याने तो मोठमोठ्याने रडत होता. परंतु सर्वा पुढे हातबलतेने पाहण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे प्रशांत देव यांनी सांगितले. रात्रीच्या काळोखात तीन महाकाय लाटा आमच्या नौकेवर आदळल्या नंतर आम्ही जगण्याची आशाच सोडून दिल्याचे नौकेचे प्रमुख तांडेल चंदन देव यांनी लोकमतला सांगितले.शेवटी मच्छीमारच ठरले त्यांच्यासाठी देवदूतशुक्र वार, शनिवार दोन दिवस पावसाने पुन्हा रोद्र रूप धारण केल्याने सातपाटी सागरी पोलीस स्टेशन चे सहा.पोलीस निरीक्षक केदार शिंदे यांनी कोस्ट गार्ड शी संपर्क साधून मदत उपलब्ध करून देण्याचे कळविले होते. मात्र त्यांच्या कडून ती वेळीच उपलब्ध होत नसल्याचे दिसून आल्या नंतर नातेवाईक असलेल्या पंढरी भास्कर मेहेर यांनी आपली हरहर गंगे ही नौका दिली. अनेक वेळा संकटग्रस्त मच्छीमारांच्या मदतीसाठी धावून जाणारे अनिल चौधरी यांनी भूषण मेहेर, सुंदर पाटील,राम केणी,संदीप पाटील,धीरज मेहेर,मिलन तांडेल यांनी त्या नौकेसह समुद्रात शुक्रवारी रात्री २ वाजता काळोखात झेप घेतली. वादळी वारे आणि तुफानी लाटाना छेदत ही नौका ५ तासांनी न्यूधवलजवळ पोहोचली. १५ ते २० फुटांच्या लाटांना थोपवित बंद पडलेल्या नौकेला दोरखंडाने बांधून आणणे खूप जोखमीचे होते.या सर्व प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत शेवटी न्यू धवल नौका आज दुपारी १४ खलशासह सुखरूप सातपाटी बंदरात शिरली आणि सर्वांनी सुटकेचा एकच निश्वास टाकला.