वसई : वसई - विरार शहर महापालिका प्रशासनाच्या स्वच्छता-आरोग्य विभागाने शहरातील निर्माल्य संकलन करून खत निर्मितीचा एक अभिनव संकल्प सोडला असून यासाठी वसई पूर्वेकडील स्मशानभूमीच्या बाजूला एक प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती स्वच्छता विभागाकडून देण्यात आली. या प्रकल्पाकरता आवश्यक यंत्रणा आणि त्यासोबत प्रथम संपूर्ण शहराचे लवकरच सर्वेक्षण केले जाणार आहे.सर्वसाधारण हार, फुले, बेल, शमी, दुर्वा याचा वापर हा बहुतांशी पूजेसाठी केला जातो, तर माणसाचा मृत्यू झाल्यावर देखील त्याच फुलांचा हार, प्रसंगी चादर वापरली जाते. त्यावेळी हे सर्व निर्माल्य कलशात किंवा इतरत्र जमा होत असते. दरम्यान पालिका हद्दीत जशी कचऱ्याची समस्या हा बिकट विषय आहे त्यानुसार हार, फुलं यांच्या निर्माल्यांचा विषय ही तितकाच गंभीर आहे. यावर उपाय म्हणून शहरातील निर्माल्य संकलित करून जैविक व अजैविक असे वर्गीकरण करून उत्तम दर्जाचे सेंद्रिय खत तयार करण्याचा विचार आता पालिकेने केला असून यंदाच्या गणशोत्सवा पासूनच या उपक्र माची सुरु वात होणार आहे.वसई पूर्वेला निर्माल्य संकलन करणे त्यानंतर त्यावर प्रक्रि या व खतनिर्मिती करणे यासाठी पालिकेने यंत्रणा उभारण्याची तयारी दर्शविली असून हा प्रकल्प आता उभारला जाणार आहे. यामध्ये प्रत्येक प्रभागात टप्प्याटप्प्याने निर्माल्य संकलित केले जाईल, आणि विशेष म्हणजे यासाठी शहरातील काही महिला सामाजिक संघटनां या सुद्धा सहकार्य करण्यासाठी पुढे आल्या आहेत.अनेक टन निर्माल्य प्रकल्पाला पोषकगणेशोत्सव काळात सार्वजनिक मंडळे, घरगुती गणपती बसवणाºया नागरिकांना ही आवाहन केले जाणार आहे. त्याचबरोबर वर्षभरात होणारे उत्सव आणि त्याची माहिती घेवून त्याप्रकारे निर्माल्य नियोजन करण्यात येणार आहे. एक स्मशानभूमीतून रोज २० किलो हार जमा होतात. यासह मंदिरातही निर्माल्य निर्माण होते त्यामुळे अनेक टन निर्माल्य जमा करता येणार आहे. हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी पावले उचलली जात आहेत.बैठका, चर्चांमधून जनजागृतीपालिकेच्या क्षेत्रात एकूण १६९ स्मशानभूमी, ५०० हुन अधिक मंदिरे, मस्जिद व चर्च आहेत. याठिकाणी हार - फूले जमा होतात. शहरातील निर्माल्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या स्वच्छता विभागाने यासाठी नागरिकांची मदतीसाठी शहरभर बैठका आणि त्यातून चर्चा होणार आहे.
निर्माल्य संकलनातून करणार खतनिर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 12:11 AM