शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

तारापूर एमआयडीसीमध्ये टँकरना ‘नाे एंट्री’, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 12:24 AM

Tarapur News : तारापूर एमआयडीसीमधील उद्योगांमधून साेडल्या जाणाऱ्या घातक रासायनिक पाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ४० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.

- पंकज राऊतबोईसर : तारापूर एमआयडीसीमधील उद्योगांमधून साेडल्या जाणाऱ्या घातक रासायनिक पाण्यावर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार ४० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र, हे आदेशच धाब्यावर बसवून उद्याेग टँकरद्वारे बेकायदा अतिरिक्त पाणी विकत घेत आहेत. त्यामुळे सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पालघरचे जिल्हाधिकारी डाॅ. माणिक गुरसाळ यांनी ५ डिसेंबर ते २ फेब्रुवारी २०२१ पर्यंत टँकर वाहतुकीवर बंदीचे आदेश जारी केले आहेत. यासाठी बंदी कालावधीत औद्याेगिक क्षेत्रात टँकरची वाहतूक हाेऊ नये यासाठी दक्षता पथके नेमून पाेलिसांनाही लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येथील उद्याेगांच्या गैरप्रकारांना चांगलाच चाप बसला आहे. यातून अग्निशमन दलाची वाहने वगळण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीत पाण्याच्या टँकरना एमआयडीसीच्या लेखी परवानगीने वाहतुकीची मुभा देण्यात आली आहे.तारापूर एमआयडीसीतील काही उद्योगांमधून तसेच बाहेरून आणि परराज्यातून टँकरमधून घातक रासायनिक सांडपाणी तारापूर व परिसरात रात्रीच्या अंधारात आणून त्याची बेकायदा विल्हेवाट लावली जात असल्यामुळे आसपासच्या परिसरातील प्रदूषणात वाढ होऊन त्याचे गंभीर परिणाम पर्यावरणावर हाेत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ही गंभीर बाब महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांसाेबत ११ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत निदर्शनास आणून दिली होती.  त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष आदेश काढून टँकरवर बंदी  घातली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांनी तारापूर एमआयडीसीमध्ये बेकायदा विल्हेवाट लावण्यासाठी अनेक टँकरने पाणी आणि विविध घातक रासायनिक कचरा वाहतूक करीत असल्याचे आढळून आले आहे. 

प्रक्रियेविनाच साेडतात पाणी ४० टक्के पाणीकपातीनंतर उत्पादन प्रक्रियेसाठी टँकरद्वारे अतिरिक्त पाणी बेकायदा घेत असल्याने २५ एमएलडी क्षमतेच्या सीईटीपीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सांडपाणी येऊ लागल्याने अतिरिक्त सांडपाणी प्रक्रियेविना नवापूरच्या समुद्रात सोडले जात असल्याने त्याचा गंभीर दुष्परिणाम मासेमारी, शेती व आरोग्यावर होऊ लागल्यामुळे अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने हरित लवादाकडे दावा दाखल करून लढ़ा सुरू केला आहे. या लवादाच्या दिल्ली खंडपीठाने तारापूर व परिसरातील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी आदेश दिले होते.

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरार