आशिष राणे, वसई रिक्षा-टॅक्सीची नोंदणी रद्द करण्यासाठी यापुढे फिटनेस पीयूसी, इन्शुरन्स यांची गरज भासणार नाही असे परिपत्रक परिवहन आयुक्त यांनी काढले आहे मग आरटीओ ने यापूर्वी वाहन नोंदणी रद्द करण्यासाठी घेतलेले पैसे ते परत करणार का ? असा सणसणीत सवाल रिक्षा चालक मालक महासंघाचे अध्यक्ष विजय खेतले यांनी विचारला आहे .
मोटार वाहन कायद्यातील तरतुदींप्रमाणे जर एखादी रिक्षा व टॅक्सी चालविण्यात योग्य नसेल अथवा आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसेल तर तिची नोंदणी रद्द करण्याची तरतूद आहे, त्यानुसार संबंधित प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयाकडे अर्ज करून त्या वाहनाची नोंदणी करण्याची तरतूद आहे.याकरता यापूर्वी राज्यातील सर्वच उपप्रादेशिक व प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी लिपिक हे त्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र विमा व वायु प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, यांची मागणी करत असतात.
मात्र मोटर वाहन कायद्यात हे सर्व घेण्याची ची तरतूद करण्यात नाही. तथा त्यांच्याकडून दंड वा त्यासाठी तडजोड शुल्क घेण्याचेही ही कायद्यात नाहीआता याबाबत परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य लक्ष्मण दराडे यांनी दि.17 डिसेंबर 2020 रोजी एक परिपत्रक काढून यापुढे रिक्षा टॅक्सी याची नोंदणी रद्द करताना फिटनेस, इन्शुरन्स, पीयूसी, यांची मागणी करू नये असे बजावले आहे.तसेच त्यांच्याकडून दंड व तडजोड रक्कम ही घेऊ नये असे परिपत्रकात म्हटले आहे.
मात्र यापूर्वी वरील कारणांसाठी संबंधित प्रादेशिक उपप्रादेशिक कार्यालयात हजारो रिक्षा-टॅक्सी चालकांचे घेतलेले पैसे त्यांना परत मिळतील का ? असा प्रश्न आता ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाचे अध्यक्ष विजय खेतले यांनी उपस्थित केला आहे .अर्थात च या प्रति प्रश्नाने परिवहन आयुक्त अडचणीत व कोंडीत सापडले आहेत.
काय आहेत परिवहन आयुक्त कार्यालयांच्या तरतुदीमोटर वाहन अधिनियम,1988 च्या कलम 55 मध्ये वाहन मालकाने वाहन आर्थिक दृष्ट्या परवाडण्यापलीकडे नादुरूस्त झाल्यास या वापरास कायमस्वरूपी असम हे हेर्थ ठरल्यास त्याचे असे वाहन नोंदणी रद्द (निर्लेखित) करण्याबाबत तरतूद आहे. अशा बाबतीत मालकाने नोंदणी प्राधिकारी यांच्याकडे वाहन नोंदणी प्रमाणपत्र पाठविणे आवश्यक आहे अशा अशयाची तरतूद आहे.
2. राज्य परिवहन प्राधिकरण ठराव क्र. 07/2013 नुसार टॅक्सीच्या तसेच ठराव क्र.17/2020, दि.25.09.2020 नुसार ऑटोरिक्षाच्या वयोमर्यादेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यास अनुसरून वाहन मालकाने वाहनाची वयोमर्यादा पूर्ण झाल्यामुळे अथवा त्यापूर्वीच वाहन आर्थिक दृष्टया परवडण्यापलीकडे नादुरूस्त झाल्यास त्याचे वाहन नोंदणी रद्द (निर्लेखित) करण्याबाबत परिवहन कार्यालयातस्वेच्छेने अर्ज केला असता, त्याचेकडून सदर वाहनाने वैध विमा प्रमाणपत्र सादर करण्याबाबत आग्रह धरण्यात येतो.
3.) वाहन निर्लेखित करतेवळी वैध विमा प्रमाणपत्र योग्यता प्रमाणपत्र व वायू प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र सादर करण्याबाबत सद्यस्थितीस मोटर वाहन कायदा व नियमांत कोणतीही तरतूद नाही. तसेच वाहन वापरण्यायोग्य नसल्याने त्याची आवश्यकता सुद्धा नाही.
4. सबब, उक्त वाहन वापरास कायमस्वरूपी असमर्थ ठरल्यास असे वाहन निर्लेखित करतेवेळी वाहन मालकाकडून वैध विमा प्रमाणपत्र योग्यता प्रमाणपत्र व वायू प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र सादर करण्याचा आग्रह धरण्यात येऊ नये अथवा त्यासाठी दंडाची/ तडजोड शुल्काची आकारणी करण्यात येऊ नये, तथापी, मोटार वाहन कर, पर्यावरण कर ,इत्यादी थकीत कर वसूल करण्यात यावा .मात्र सदर वाहन कागदपत्रांची वैधता संपली असताना रस्त्यावर चालताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करावी.अशा तरतुदी आहेत.