शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

नोटाबंदीने रिसॉर्ट, पर्यटन व्यवसायात मंदी

By admin | Published: December 31, 2016 3:56 AM

नोटाबंदीची पन्नास दिवसांची मुदत पूर्ण झाली तरी नवीन नोटांची टंचाई कायम असल्याचा परिणाम ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर झाला आहे.

- अनिरुद्ध पाटील, बोर्डीनोटाबंदीची पन्नास दिवसांची मुदत पूर्ण झाली तरी नवीन नोटांची टंचाई कायम असल्याचा परिणाम ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर झाला आहे. डहाणू आणि बोर्डी या पर्यटनस्थळी पर्यटकांची संख्या कमालीची रोडावल्याने पर्यटन व्यवसायाला फटका बसला आहे. नोटाबंदीनंतर बँकांतून पुरेशी रक्कम काढता येत नाही, तर एटीएम मधूनही केवळ दोनहजार रूपये निघतात. त्यापैकी बहुसंख्य एटीएम बंद असल्याने नागरिकांकडे पुरेसे पैसे नाहीत. डहाणू आणि बोर्डी ही समुद्र पर्यटन स्थळे ग्रामीण भागात आहेत. येथे इंटरनेट सेवेचा बोजवार उडालेला असतो. विस्कळीत सेवेमुळे कॅशलेस व्यवहारांवर मर्यादा आलेली आहे. या सर्वांचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झालेला आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गत वर्षीच्या तुलनेत हॉटेल बुकिंग ३० ते ४० टक्के कमी झाल्याचे स्थानिक हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दरम्यान या वर्षीचे हे सेलिब्रेशन विकेंडला आल्याने कदाचित पर्यटक ऐनवेळी दाखल होण्याची आशा काही व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी समुद्रातील विविध प्रकारचे मासे, गावठी कोंबडी तसेच शाकाहारी खवयांसाठी हंगामानुसार स्थानिक भाजीपाला, चिकूचे प्रक्रिया केलेले पदार्थ आदींची बेगमी केलेली आहे. डहाणू शहरातील हॉटेल्स वगळता बोर्डी परिसरात शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांनी विविध योजने अंतर्गत कृषी पर्यटन केंद्र उघडलेली आहेत. येथे मद्य विक्र ी केली जात नाही. गुजरातेत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली शिवाय दमण व सिल्व्हासा येथे मद्य खरेदी कॅशलेस पद्धतीने केली जाते त्यामुळे दमणच्या दारूची टंचाई झाल्याने पर्यटकांची कोंडी झाली आहे. या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे पर्यटन व्यवसायावर मंदीचे सावट पसरले आहे. समुद्रकिनारी उंट सफारीचा व्यवसाय करणारे, रिक्षा चालक आणि स्थानिक विक्रेत्यांना त्याचा आर्थिक फटका बसला आहे. खाजगी इंटरनेट सुविधा तसेच ३१ डिसेंबेरच्या सेलिब्रेशनसाठी थीमवर आधारित विविध खेळ, प्लॅस्टीक करन्सीचे पर्याय उपलब्ध केले आहेत. या उपाययोजनेमुळे गुजरात तसेच मुंबई, नाशिक या पर्यटकांनी काहीसा प्रतिसाद दिला आहे.- श्रीकांत सावे (हिलझील, हॉटेलचे मालक) ‘‘ग्रामीण भागात कॅशलेस व्यवहारवरील मर्यादा तसेच वर्षाअखेरीस दोनहजारच्या नोटा बंदीची बातमी पसरल्याने पर्यटकांची संख्या कमालीची रोडावली आहे.’’ - प्रशांत पाटील (मैत्री पार्क हॉटेलचे मालक)