शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

विरार-डहाणू चौपदरीकरणासाठी बैठक, लोहमार्गालगतच्या जमीनमालकांना नोटिसांद्वारे निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 4:19 AM

मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयुटीपी-३) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) मार्फत होणाºया विरार-डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण विषयीची महत्त्वपूर्ण बैठक गुरूवारी पालघर येथे आयोजिण्यात आली आहे.

वसई : मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयुटीपी-३) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) मार्फत होणाºया विरार-डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण विषयीची महत्त्वपूर्ण बैठक गुरूवारी पालघर येथे आयोजिण्यात आली आहे. या रेल्वे विस्तारालगत असलेल्या जमीनीच्या मालकांना या बैठकीचे तलाठ्यांमार्फत नोटीसवजा निमंत्रण दिले गेल्याने तिला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.एमयूटीपी-१ च्या अंतर्गत २०१२ मध्ये कामे पूर्ण झाली असून एमयूटीपी-२ ची कामे सध्या सुरू आहेत. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी एमयूटीपी-३ ला मंजुरी मिळाली असून त्यात ६३ किलोमीटरच्या विरार-डहाणू रोड चौपदरीकरणाच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे लाइनच्या पूर्वेकडे माल वाहू द्रुतगती मार्ग अर्थात डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोर (डीएफसी)चे काम सुरू असल्याने विरार-डहाणू रोड दरम्यान चौपदरीकरणांतर्गत टाकण्यात येणारी तिसरी व चौथी रेल्वे लाइन सध्याच्या रु ळांच्या पश्चिमेस टाकण्याचे प्रस्तावित आहे.हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेल्या लोहमार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक करण्यात येणार असून नवे दोन ट्रॅक हे फक्त उपनगरीय सेवेसाठी वापरले जाणार आहेत. यामुळे उपनगरीय सेवांमध्ये वाढ होऊन या पट्टयातील परिवहन सोयीचे होऊ शकेल असे पश्चिम रेल्वेचे म्हणणे आहे. याच बरोबरीने प्रवाशांसाठी चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरविण्याचा मानस पश्चिम रेल्वेने या योजनेसंदर्भात आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीद्वारे व्यक्त केला आहे.चौपदरीकरणाच्या प्रकल्पामध्ये विरार-डहाणू रोड दरम्यान सर्वच रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला नवीन फलाटांची उभारणी होणार असून सफाळे व वाणगाव येथे नवीन विद्युत सब-स्टेशनची उभारणी, विरार, बोईसर व डहाणू रोड येथे सायडींग रु ळांची उभारणी, इएमयूच्या देखभालीसाठी कार्यशाळा किंवा तत्सम व्यवस्था, उड्डाणपूल, सबवेची उभारणी होणे अपेक्षित आहे.या ६६ किलोमीटरच्या पट्ट्यात वैतरणा नदीवरील दोन महत्त्वपूर्ण पूलासह १६ मोठ्या व ६४ लहान पुलांची उभारणी केली जाणार आहे. या पट्टयातील १४ लेव्हल-क्रॉसींग बंद करून त्याऐवजी पर्यायी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पाच उड्डाण पुलांचे रुंदीकरण करून दोन नवे उड्डाण पूल उभारण्याचे या प्रकल्पामध्ये प्रास्तावित आहे.या चौपदरीकरणासाठी नव्याने जमिनीचे अधिग्रहण केले जाणार किंवा नाही याबाबत कोणत्याही प्रकारचे स्पष्ट संकेत नसले तरी या कामामध्ये इमारती, मंदिरे, तिकीट खिडक्या, झोपड्या, शौचालय, मेंटेनन्स खोल्या, कर्मचारी क्वॉटर्स आदी तोडण्यात येऊन ते नव्या ठिकाणी बांधण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. शिवाय रेल्वे लगतच्या जमीन मालकांना या सभेचे निमंत्रण दिले गेल्याने त्याचा जमीन अधिग्रहणाशी संबंध असावा असा तर्क लावला जात आहे.हे पाहता २ नोव्हेंबरच्या पालघर येथील मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या बैठकीला प्रवाशांसह रेल्वेलगतच्या जमीन मालकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.विरार-डहाणू रोड चौपदरीकरणात काय घडणार आहे?- रेल्वे रुळालगतच्या २५०० झाडांची कत्तल होणार. त्यांच्या बदल्यात साडेबारा हजार वृक्षांची लागवड करण्याचे प्रस्तावित.- बांधकामासाठी लागणाºया ५०० कामगारांच्या हंगामी निवास व्यवस्थेची उभारणी.- अस्तित्वात असलेल्या रेल्वे रूळ व बांधकामादरम्यान बॅरिकेडींग करण्याचे प्रस्तावित- अस्तित्वात असलेल्या जलवाहिन्या, इलेक्ट्रीक व टेलीकम्युनिकेशन केबल्स, गटारी व्यवस्थेचे तसेच ओव्हरहेड वायर, भूमिगत केबलचे होणार संवर्धन- सुमारे ८.५ हेक्टर क्षेत्रावरील कांदळवन (मॅनग्रोव्ह) ची कत्तल झाली तरी नियमाप्रमाणे त्यांची पुनर्लागवड होणार- २९ लक्ष घनमीटर इतक्या भरावासाठी गौण खनिजाची लागणार गरज. त्याच्या उत्खननाची अधिकृत परवानगी असणाºयांकडूनच खरेदी होणार- रेडी मिक्स कॉंक्र ीट प्लान्टची आवश्यकतेनुसार होणार उभारणी- ४.५० लक्ष घनमीटर उंच भागाचे सपाटीकरण करून या मातीचा भरावासाठी होणार वापर- पादचारी पुलांच्या उभारणीसाठी प्री-फॅब्रीेकेटेड साहित्याचा होणार वापर- सफाळे, वाणगाव येथे दोन नव्या विद्युत सबस्टेशनची उभारणी, पालघरचे विद्युत सबस्टेशन स्थलांतरित होणार- वृक्षांच्या पुनर्लागवडीसाठी होणार प्रयत्न. नैसर्गिक सौंदर्य राखण्यासाठी केले जाणार प्रयत्न

टॅग्स :Vasai Virarवसई विरार