वाडा : राज्यात माध्यमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी कृषी पदवीधारक उमेदवारही पात्र ठरणार आहेत. माध्यमिक शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदव्यांमध्ये सुधारणा करुन काही नव्या पदव्यांचा समावेश करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. या बाबत १२ जून रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात कृषी पदवीचा समावेश केल्याने राज्यातील हजारो कृषी पदवीधारकांना दिलासा मिळणार आहे. या शासन निर्णयाचे कृषी पदवी व कृषी विद्यार्थी संघटनानी स्वागत केले आहे.
यासंबंधीचा शासन आदेश शालेय शिक्षण विभागातर्फे नुकताच जारी करण्यात आला. या निर्णयानुसार इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षकांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीव विज्ञान, पर्यावरणशास्त्र विषयातील पदव्यांसोबतच सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवरसायनशास्त्र आणि कृषीशास्त्र या पदव्यांचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच इयत्ता नववी व दहावी शिक्षकांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेमधील मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीव विज्ञान, पर्यावरणशास्त्र विषयातील पदव्यांसोबतच सूक्ष्मजीवशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जीवरसायन शास्त्र आणि कृषीशास्त्र या पदव्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय इतरही काही विषयातील पदव्यांचा समावेश नव्या निर्णयात करण्यात आला आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी आता कृषी पदवीधारक उमेदवारही पात्र ठरणार आहेत. कृषी पदवीधारकांचा माध्यमिक शाळांच्या नोकरीतील प्रवेशाचामार्ग मोकळा होणार आहे. या शासन निर्णयाचा विविध कृषी पदवी व कृषी विद्यार्थी संघटनानी स्वागत केले आहे.मुख्यमंत्र्यांना कृषी शिक्षक नेमण्याची मागणीच्अजूनही ग्रामीण भागातील शेतकरी नवनवीन आधुनिक माहिती आणि तंत्रज्ञानाची माहिती नसल्याने शेती उत्पादनात मोठे नुकसान होत आहे. शेती क्षेत्रातील व्यवसायात तरुणांची संख्या कमी होऊ लागली आहे. तरु णांना शाळेय शिक्षणापासून शेतीचे शिक्षण दिल्यास शेती क्षेत्राला अच्छे दिन येतील व मोठा रोजगार उपलब्ध होईल.च्याबाबत तत्कालीन शिक्षण मंत्री वसंत पुरके यानी शालेय शिक्षणात कृषी शिक्षणाचा समावेश करावा अशी शिफारस केली होती.त्यामुळे शासनाने शालेय अभ्यासक्र मात कृषी विषय शिक्षणाचा समावेश करु न कृषी पदविका, पदवीचे शिक्षण घेतलेल्या शिक्षकाचा नेमणुका कराव्यात, अशी मागणी कोकण विभाग कृषि पदविकाधारक संघर्ष समितीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे.१२ जूनच्या नव्या शासन निर्णयामुळे माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी आता कृषी पदवीधारक उमेदवारही पात्र ठरणार आहेत. कृषी पदवीधारकांचा माध्यमिक शाळांच्या नोकरीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे. या निर्णयाने राज्यातील हजारो कृषी पदवीधारकांना दिलासा मिळणार आहे. या शासन निर्णयचा आम्ही स्वागत करतो, परंतु आमची मूळ मागणी आहे ती पहिली ते १२ वी शालेय शिक्षणात (अभ्यासक्र मात) कृषी विषयाचा समावेश करुन कृषी शिक्षक नेमावेत याबाबत आमच्या संघटनेमार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व कृषी मंत्री याना निवेदन दिले आहे. या मागणीबाबत शासनाने गांभिर्यपूर्वक विचार करावा.- अमोल सांबरे, उपाध्यक्ष,कोकण विभाग कृषी पदविकाधारक संघर्ष समिती