वसई : वसई - विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील रहदारीचा ताण कमी करण्यासाठी महानगरपालिकेने मुख्य रस्त्याच्या ठिकाणी १२ उड्डाणपूल बांधण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्यानंतर आता वसई-विरार शहराला जोडणारा रिंगरोड आणि पालघरला जोडणारा कोस्टल रोड साकारण्यात येणार आहे. मंजूर विकास आराखड्यामध्ये हा कोस्टल रोड समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत ठेवण्यात आला होता. त्याला महापालिकेने एकमताने मंजुरी दिली आहे. वसई - विरार शहर महानगरपालिका क्षेत्र मुंबईलगत असल्याने येथे नागरिकीकरण झपाट्याने वाढते आहे. येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. महापालिकेने पालिका हद्दीत लवकर जाता यावे, यासाठी ४० मीटरचा रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे.पालघर जिल्ह्याला जोडला जाईल हा कोस्टल मार्गवसई तालुका आणि तिथून पालघर तालुक्याला जोडणारा सागरी किनारा मार्ग रुंद करण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला होता. महापालिकेतून वगळण्यात आलेल्या २१ गावांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून त्याचे काम वसई - विरार मनपाच पहात आहे. तर या वगळलेल्या गावांपैकी मौजे कोल्हापूर व मौजे चिखलडोंगरी येथूनच कोस्टल रोड जाणार असून तो थेट पालघरला जोडणारा आहे. पालघर तालुक्याला जोडणारा सागरी किनारा मार्ग रुंदीचा प्रस्ताव मंजूर विकास आराखड्यात समाविष्ट करण्यास आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे प्रमाणे कार्यवाही करण्यासाठी सर्वसाधारण सभेपुढे आणण्यात आला होता.कसा असेल रिंगरोड मार्ग ! : हा प्रस्तावित रिंग रोड मार्ग गास-कोपरी येथून सुरू होऊन चिखल डोंगरे-बोळींज-सोपारा शुर्पारक मैदानाजवळून -बरामपूर-उमेळे-जूचंद्र-माणकिपूर-आचोळे-तुळींज-विरार फुलपाडा-कोपरी-गासकोपरी असा आहे.प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण, नगररचना विभागाची माहितीरिंगरोड व कोस्टल रोडचे सर्वेक्षण जवळपास पूर्ण झाल्याचे या सर्वसाधारण सभेत सांगण्यात आले. प्रकल्पाचा रस्ता ज्या भागातून जाणार आहे, अशा प्रकल्पबाधितांशी बोलून येथे सर्वेक्षण झाले आहे. काही पाणथळ जागा तसेच सीआरझेड भागातून देखील हा प्रकल्प जाणार असल्याने त्यांचे नकाशेही तयार असल्याचे पालिकेच्या नगररचना विभागाकडून स्पष्ट केले आहे.
पालघर-वसई प्रवास होणार वेगवान, रहदारीचा ताण होणार कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 1:19 AM