नालासोपारा : वसई तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून वीजचोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असून रात्रीच्या सुमारास वीज खांबावर आकडा टाकून वीजचोरी केली जाते. अनेक तक्रारींनंतर महावितरणच्या भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी नालासोपारा शहरातील धानिवबाग आणि वाकणपाडा परिसरात धाडी टाकून वीजचोरीचा पर्दाफाश करत तब्बल १२६ जणांविरु द्ध सोमवारी वसई पोलीस ठाण्यात ३ वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.या वीजचोरांवर नियंत्रण आणण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महावितरणच्या उच्च अधिकाºयांनी भरारी पथक तयार करून त्या पथकाद्वारे कारवाई करण्यासाठी सुरुवात केली आहे. नालासोपारा पूर्वेकडील धानिवबाग आणि वाकणपाडा या परिसरातील चाळींमध्ये काळ्या रंगाच्या दोन छेडा असलेल्या सुमारे १० ते ३० मीटर लांबीच्या वायरने चाळीच्या किंवा त्यांच्या परिसरातून जाणाºया इनकमिंग वायरवर टेप करून टेपिंग पद्धतीने विनामीटर आपल्या घर किंवा कार्यालयातील विद्युत उपकरणांना जोडून महावितरणची वीजचोरी केली जात असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आले. या प्रकरणी अधिकारी निकुंज बाबूलाल वैष्णव (३२) यांनी ३ तक्र ारी देत १२६ जणांवर वसई पोलीस ठाण्यात सोमवारी ३ वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. या १२६ वीज चोरणाºया आरोपींनी ७७ हजार ९२० युनिटची वीजचोरी करून तब्बल १८ लाख ८५ हजार ५४२ रुपयांचे महावितरणचे नुकसान केले आहे.नालासोपारामध्ये सर्वात जास्त होते वीजचोरीवसई तालुक्यात सर्वात जास्त वीजचोरी नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन, गावराई पाडा, वालई पाडा, मोरेगाव, नागिनदास पाडा, आचोळे डोंगरी, विरार पूर्वेकडे कातकरी पाडा, चंदनसार, मनवेलपाडा, कारगिल नगर, वसई पूर्वेकडे भोयदा पाडा, नवजीवन, सातीवली, वालीव तर नायगांव पूर्वेकडील जुचंद्र, टाकी पाडा या विभागात होते. या विभागात अनधिकृत बांधकामे मोठ्या जोमाने सुरु असल्यामुळे आणि वीजचोरी करणाºया टोळ्या याच विभागात कार्यरत असून या इमारतींतील लोकांना चोरीची वीज वापरण्यास देतात. संध्याकाळ झाली की विजेच्या खांबावर आकडे टाकून वीजचोरी केली जाते.
अबब ! तब्बल १२६ वीजचोर पकडले, धानिवबाग, वाकणपाडा परिसरात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 6:02 AM