बोईसर : कोलवडे ग्रामपंचायत हद्दीत घन कचरा टाकण्यास ग्रामस्थांनी आज प्रांता कडील बैठकीत प्रखर विरोध केल्यानंतर एमआयडीसीतील मोकळ्या भूखंडावर कचरा टाकण्याचा निर्णय घेऊन तात्पुरता तोडगा काढण्यात आला आहे.कोलवडे ग्रामपंचायतिने १ आॅक्टोबर पासून बोईसर व इतर ग्रामपंचायतींना एमआयडीसी व महसूलच्या प्लॉट वर घन कचरा टाकण्यास बंद केल्या नंतर बोईसरला सर्वत्र कचरा साठल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होतापालघरच्या तहसीलदारांनी कोलवडेच्या सरपंचांना पत्र पाठवून डम्पिंग ग्राऊंडकडे जाणाºया रस्तावरील गेटला लावलेले कुलूप काढून रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते. परंतु कोलवडेचे ग्रामस्थ त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. दरम्यान, गुरु वारी (दि ५) बोईसर ग्रामपंचायती मध्ये सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी बैठक घेऊन बोईसर पोलीस स्थानकात ठाण मांडली होतीया सर्व घडामोडी नंतर शुक्रवारी पालघरचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) विकास गजरे यांच्या कार्यालयात झालेल बैठकीला तहसीलदार महेश सागर, गट विकास अधिकारी जाधव, एमआयडीसी तारापूर विभागाचे उप अभियंता चंद्रकांत भगत, बोईसर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार इत्यादी शासकीय अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत उपस्थितांनी कचºयाचा गंभीर प्रश्न व डम्पिंग ग्राऊंडचा बंद केलेला रस्ता खुला करण्याची मागणी केली परंतु कोलवडे ग्रामपंचायती कडून कचरा टाकू न देण्याच्या भूमीकेवर ठाम राहील्याने संघर्ष वाढला होता.
आता एमआयडीसीतील भूखंडावर कचरा टाका, संघर्षावर तात्पुरता निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 12:45 AM