शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

‘मधुक्रांती’  गावाकडून शहराकडे; मधमाशीपालन प्रशिक्षणाच्या माध्यमातून मधपालक घडवण्याचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 1:58 AM

मुंबईसह विरार-वसई शहरात काही युवकांनी मधपेट्या नेऊन यशस्वीरीत्या संगोपण केले आहे. शहरात सार्वजनिक आणि रहिवासी संकुलात बाग असते.

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : मधुमक्षिका या कृषीपूरक व्यवसायाला प्रमुख व्यवसायाचे स्थान मिळवून देण्यासाठी कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातर्फे सातत्याने प्रयोग सुरू आहेत. याकरिता मधुमक्षिका पालन प्रशिक्षणाच्या माध्यमातून मधपालक घडवून अनेकांच्या हाताला रोजगार आणि शुद्ध मधाच्या उत्पादनातून या केंद्राने आरोग्याचे देणे दिले आहे. दरम्यान, मुंबईस्थित एस्सेल वर्ल्ड या पर्यटनस्थळी मधुमक्षिका पालन सुरू करण्यात आल्याने, मधुक्रांती गावाकडून शहराकडे पोहोचविण्यात त्यांना यश आले आहे.

डहाणू तालुक्यातील कोसबाड कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनातून मुंबईमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध एस्सेल वर्ल्ड या नावाजलेल्या पर्यटनस्थळी सातेरी मधमाशीच्या दहा पेट्यांचे युनिट उभारले जात आहे. येथे पर्यावरण, अन्ननिर्मिती आणि जैवविविधता टिकविण्यात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मधमाश्यांच्या कार्याची माहिती दिली जाणार आहे. या प्रसिद्ध ठिकाणी पर्यटकांचा राबता असल्याने शहरातील निसर्गप्रेमी नागरिकांना या व्यवसायाची माहिती मिळेल, असे एस्सेल वर्ल्डचे उपाध्यक्ष अजित लामधाडे यांनी सांगितले.

मुंबईसह विरार-वसई शहरात काही युवकांनी मधपेट्या नेऊन यशस्वीरीत्या संगोपण केले आहे. शहरात सार्वजनिक आणि रहिवासी संकुलात बाग असते. मुंबई, ठाण्यात कांदळवन क्षेत्र असल्याने अशा ठिकाणी पाळीव मधमाश्यांच्या पेट्या ठेवणे शक्य आहे. शहरांत मधमाशीपालन हा एक वेगळा उपक्रम या केंद्रातर्फे राबविण्याचा मानस आहे. या कीटकांचे पर्यावरणात महत्त्वपूर्ण स्थान असून मधमाशीला ‘राष्ट्रीय कीटक’ घोषित करण्याची शेतकऱ्यांची मागणी असल्याचे कीटकशास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांनी सांगितले. आजवर याचा २४२९ प्रशिक्षणार्थ्यांनी लाभ घेतला असून ३१४ जणांनी व्यवसाय सुरू केला आहे.

कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्र हे महाराष्ट्रातील पहिले कृषी विज्ञान केंद्र आहे. येथे ४४ वर्षांपासून मधमाशीपालन प्रशिक्षण दिले जाते. त्याद्वारे अनेक मधुपालक घडविले आहेत. शहरी भागात उपक्रम सुरू झाल्याने मधुक्रांती घडणार आहे. - डॉ. विलास जाधव, प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल

पूर्वी जंगलातून मध गोळा केले जाई. या केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याला दोन प्रशिक्षण वर्गांतून मधुमक्षिका पालनाविषयी शास्त्रीय माहिती दिली जाते. शहरातही हा व्यवसाय करून रोजगारनिर्मिती शक्य आहे.- प्रा. उत्तम सहाणे, कीटकशास्त्रज्ञ,  कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड.