बोर्डी : जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध रेती उत्खनन व वाहतूक तक्रार निवारण कक्षाच्या स्थापनेनंतर घोलवड पोलीस ठाण्यात पहिल्या गुन्ह्याची नोंद झाली. दरम्यान घोलवड ग्रामपंचायती विरुद्ध तक्रार नोंदली असतांना प्रशासनाने एका ग्रामस्थाला नाहक अडकविल्याचा आरोप या कक्षाकडे तक्र ार देणाऱ्या दत्ता इंदुलकर यांनी केला.या कक्ष स्थापनेनंतर १ जुलै रोजी घोलवड ग्रामपंचायती विरुद्ध बांधकामाकरिता समुद्रातील अवैध रेती उत्खनन केल्याची तक्र ार दत्ता इंदुलकर या ग्रामस्थाने कक्षाकडे नोंदवली. कक्षाने डहाणू तहसीलदारांकडे प्रकरण वर्ग करून तलाठ्यांमार्फत घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानुसार बुधवार ४ जुलै रोजी यतीन खानविलकर यांच्या विरूद्ध १ ब्रास रेतीचे अवैध उत्खनन केल्या प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ व केंद्रीय गौण खनिज कायदा कलम ८४ चे पोटकलम ७ अन्वये घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. परंतु आपण ही तक्रार खानविलकर यांच्याविरुद्ध नव्हे, तर ग्रामपंचायतीविरुद्ध नोंदविल्याचे इंदुलकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या कक्षाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेऊने त्यांनी जिल्हाधिकाºयांनाच यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे.दरम्यान या ग्रामपंचायतीच्या विकासकामाशी कोणताही संबंध नसून निवारण कक्षाकडेही माझ्या नावे तक्र ार नसतांना महसूल विभागाने खोटा गुन्हा नोंदविल्याचा आरोप यतीन खानविलकर यांनी केला आहे. ग्रामपंचायतीला पाठीशी घालण्याकरिता हा डाव असून या बाबत चौकशीची मागणी खानविलकर आणि इंदुलकर यांनी लोकमतशी बोलतांना केली आहे. आता पुढे काय होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.या विकास कामाची वर्कआॅर्डर माझ्या नावे नसून माझा कोणताही संबंध नसतांना नाहक गुन्हा नोंदविला आहे.-यतीन खानविलकर, आरोपी, अवैध रेती उत्खनन प्रकरणखानविलकरांच्या नव्हे ग्रामपंचायतीच्या विरुद्ध मी नियंत्रण कक्षाकडे तक्र ार नोंदविली होती . या पद्धतीने प्रशासन चालल्यास दक्ष नागरिक त्याकडे पाठ फिरवतील व कक्ष असफल ठरेल.-दत्ता इंदुलकर,नियंत्रण कक्षाकडे तक्र ार देणारा
अवैध रेती उत्खननाचा गुन्हा घोलवड ग्रा.पं. विरुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 3:41 AM