वसई: देशात मागील बारा दिवसांपासून शेतकऱ्यांनी कृषी विधेयक कायदा रद्द करण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. तर या आंदोलनाला बारा दिवस झाले तरी केंद्र सरकारने शेतकऱ्याची दखल घ्यावीशी वाटली नाही.शेतकऱ्यांबाबत योग्य तो निर्णय घेत नाही. याकरता संपूर्ण देशात उद्या बळीराजाने भारत बंदची हाक दिली आहे. त्याच्या बळावर आपण जगत आहोत. त्या अन्नाची परतफेड करण्याची आता वेळ आली आहेत्यामुळेच सर्व रिक्षा चालक-मालक यांनी एक दिवस बळीराजाच्या हक्कासाठी आपली रिक्षा बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. बळीराजा जगला तर आपण जगु याचे सर्वांनी भान ठेवावे.
दरम्यान उद्या च्या भारत बंद च्या पार्श्वभूमीवर महासंघाच्या झालेल्या तातडीच्या सभेमध्ये भारत बंदला जाहीर पाठिंबा देण्याचे सर्वानुमते ठरले तरी सर्व विभागातील पदाधिकारी यांनी आपापल्या विभागातील रिक्षाचालकांना सांगावे की उद्या रिक्षा रस्त्यावर काढू नये व बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महासंघाच्या वतीनं अध्यक्ष विजय खेतले यांनी केलं आहे.