शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

हंडाभर पाण्यासाठी एक तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:31 PM

कुपनलिकेचे थेंब थेंब पाणी : कुयलू येथील महिलांनी मांडली कैफियत

- वसंत भोईर

वाडा : तालुक्यातील कुयलू ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या गाव पाड्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. एक हंडाभर पाण्यासाठी एक तासाचा कालावधी कुपनलिकेला लागत असल्याची कैफियत येथील महिलांनी मांडली. पाणी पुरवठा विभागाकडून टॅकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी तो कमी प्रमाणात व गढूळ येत असल्याने कुयलूवासियांचे हाल संपता संपत नाही.

या ग्रामपंचायतीची लोकसंख्या १८०० च्या आसपास आहे. एक गाव व अधिक पाडे आहेत. कुयलू या मुख्य गावाची ५०० च्या आसपास लोकसंख्या असून या गावात दोन विहीरी आहेत. मात्र, या विहीरीतील पाणी आटल्याने या गावाला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावासाठी शासनाकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, चार पाच दिवसांतून एकदा टँकरने पाणी येते. तेही एका विहीरीत टाकले जाते.

टँकरने टाकलेले पाणी गढूळ असल्याने ते पाणी पिण्यासाठी वापरत नसल्याने महिलांची पायपीट सुरुच आहे. टँकरने ज्या विहीरीमध्ये पाणी टाकते ती अतिशय खोल असल्याने पाणी काढताना महिलांची दमछाक होत असल्याचे गायत्री मेणे या महिलेने सांगितले. विहिरीजवळ असलेली एकमेव कुपनलिका सुरू असून तिला थेंब थेंब पाणी येते. एक पाण्याचा हंडा भरण्यासाठी एक तास लागतो, अशी माहिती उर्मिला हरड यांनी दिली.

कुपनलिकेला पाणी कमी असल्याने ती हपसण्यासाठी शारिरीक त्रासही सहन करावा लागत असल्याचे महिलांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील एक विहीर असून या विहिराला जलपर्णीनी विळखा घातला आहे. पाण्यानेही तळ गाठला आहे. तसेच, विहीरही नादुरुस्त असल्याने विहिरीत कोणी उतरत नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.अर्धा किमी अंतरावरून डोक्यावर पाणी आणणे शक्य नसल्याने आम्ही २०० लिटरची पाण्याची टाकी ३५ रूपयाला विकत घेतो, अशी माहिती वयोवृद्ध महिला मंजुळा भोईर यांनी दिली.

याच ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत धावरपाडा असून येथे ३५ घरे असून १५० च्या आसपास लोकसंख्या आहे. या पाड्यात चार दिवसातून एकदा टँकरने पाणी येत असल्याची माहिती येथील ग्रामस्थ हरिश्चंद पतंगराव यांनी दिली. या पाड्यात असलेल्या कुपनलिकेतील पाणी आटल्याचेही त्यांनी सांगितले. चार पाच दिवसांचे पाणी प्यावे लागत असल्याने काही आजार होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.अंघोळ कपडे धुण्यासाठी एका किमी अंतरावर असलेल्या नाल्यावर जावे लागत असल्याचे जर्नादन कोम यांनी सांगितले. या टंचाईमुळे दिवस-रात्र महिलांचा वेळ पाणी भरण्यासाठी जात असल्याने त्यांचा रोजगारही बुडत आहे.शासनाने टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी तो नियमाप्रमाणे दिला जात असल्याने नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.अनेक दिवसांचे पाणी आरोग्याला धोकाशासनाच्या नियमाप्रमाणे प्रति माणसी २० लिटर पाणी देण्याचा शासनाचा नियम आहे. या नियमामुळे कमी लोकसंख्या असलेल्या पाड्यात टँकर येण्यासाठी चार ते पाच दिवस लागत असल्याने अनेक दिवसांचे पाणी वापरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टँकरने आणलेले पाणी हे स्वच्छ असून याच पाण्याचा वापर अनेक गावपाड्यात केला जात आहे.-अरूण भांड, ग्रामसेवककुयलू ग्रामपंचायत