डहाणू : वाणगाव जे. एम. टी हायस्कूलचा दहावीच्या विद्यार्थ्यांचा मंगळवारी निरोप समारंभ संपल्यावर डहाणू समुद्रकिनाऱ्यावर ते दुचाकीने ट्रिपल सीट फिरायला जात होते. या वेळी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले.निरोप समारंभ उरकून तिघे विद्यार्थी दुचाकीवरून जात असताना वाणगाव-डहाणू रस्त्यावरील आसगाव जवळील खाडीत वळणावर घसरून पुलात दुचाकी पडल्याने उपदेश मदन माच्छी (वय १७) या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात अजित काशिनाथ मोरे (वय १६) आणि दुर्गेश माच्छी (वय १६), सर्व रा. डेहणे पळे कासपाडा, हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सेलवास येथील विनोबा भावे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुचाकी अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू, दोन गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 6:20 AM