शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

गारगाई प्रकल्पामुळे एक हजार कुटुंबे विस्थापित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:58 AM

शेतकऱ्यांना नोटिसा : जमीन संपादनाची कार्यवाही सुरू; पुनर्वसनाचे आश्वासन

वाडा : मुंबई शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी वाडा तालुक्यात उभारण्यात येणाºया गारगाई प्रकल्पामुळे येथील जवळपास एक हजार कुटुंबे विस्थापित होणार आहेत. ही सर्व कुटुंबे आदिवासी समाजाची आहेत. या प्रकल्प क्षेत्रात खासगी जमीन संपादनाची कार्यवाही सुरू करण्यात आली असून तशा प्रकारची नोटीस शेतकऱ्यांना देऊन जमीन संपादनाबाबत मुंबई महानगर पालिकेने विविध वर्तमानपत्रातून जाहिरातीही प्रसिद्ध केल्या आहेत.मुंबईला दररोज ४४० दशलक्ष ली. अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात हा गारगाई प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामुळे वाडा तालुक्यातील विस्थापित होणाºयांमध्ये ओगदा, तिळमाळ, खोडदे, फणसपाडा, पाचघर या महसुली गावांसह चार ते पाच अन्य पाड्यातील कुटुंबांचा समावेश आहे. तर मोखाडा तालुक्यातील आमले गावातील सर्व कुटुंबे विस्थापित होणार आहेत.या प्रकल्पामुळे एकूण ११०० हेक्टर जमीन धरणाखाली येणार आहे. या जमिनीमधील ७०० हेक्टर जमीन ही तानसा अभयारण्याची असल्याने तानसा अभयारण्याला या धरणाचा मोठा फटका बसणार आहे. या धरणासाठी मोठ्या प्रमाणात वनजमीन संपादित होणार असल्याने त्याचा परिणाम धरण परिसरातील हजारो वृक्ष संपदेवरही होणार आहे. विस्थापित होणाºया सर्व कुटुंबियांचे पुनर्वसन वाडा तालुक्यातील हरोसाळे आणि देवळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्राजवळ असलेल्या वनजमिनीवर होणार आहे.ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर प्रकल्पनदीवर हा प्रकल्प होत आहे. ६९ मीटर उंचीचे व ९७२ मीटर लांबीचे हे धरण बांधले जाणार आहे. या गारगाई धरणाच्या जलाशयातील पाणी बोगद्याद्वारे मोडकसागर धरणात आणून ते गुरुत्वीय पद्धतीने मुंबईला पुरविण्यात येणार आहे. यासाठी गारगाई ते मोडकसागर दरम्यानचे २.० किलोमीटर लांबीच्या बोगद्याचेही काम केले जाणार आहे.गारगाई प्रकल्पामुळे एकूण ८४० हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. यामध्ये सुमारे ४२४ हेक्टर खासगी जमीन वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने अधिग्रहित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे बाधित सर्व कुटुंबांचे पुनवर्सन, आवश्यक परवानग्या याची कार्यवाही मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.या प्रकल्पामुळे विस्थापित होणाºया आम्हा कुटुंबियांना शेतजमीनीचा योग्य मोबदला तसेच सर्व सोयी, सुविधा देवून पुनर्वसन केले पाहिजे.-गणपत बुधाजी कोरडे, पोलीस पाटील, ओगदा.पालघर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुनर्वसानासाठी येथील बाधीत कुटुंबियांना ज्या सुविधा व मोबदला देण्याचे आश्वासन दिले आहे ते मिळणार असेल तर आमचा विस्थापित होण्याला विरोध नाही.- गणपत दोडे, माजी सरपंच, ओगदा ग्रामपंचायत