विरार : नळजोडणीच्या प्रक्रि येत भ्रष्टाचार थांबवण्याकरिता नळजोडणी प्रक्रि या आॅनलाइन करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत फक्त पाच आॅनलाइन अर्ज आले आहेत. तसेच प्रशासनातर्फे हे अर्जही मान्य करण्यात आलेले नाही. यामुळे पालिकेतर्फे राबवण्यात आलेली आॅनलाईन नळ जोडणी प्रक्रि या फोल ठरल्याचे बोलले जात आहे.नागरिकांना पाणी व्यवस्थित उपलब्ध व्हावे यासाठी जून महिन्यात नळजोडणी प्रक्रि या आॅनलाइन करण्याचे ठरवण्यात आले होते. तर एक महिन्यात एकच आॅनलाइन अर्ज आला होता. आता आॅनलाइन प्रक्रि या सुरु करून तीन महिने झाले असून आतापर्यंत फक्त पाच आॅनलाइन अर्ज करण्यात आले आहेत. परंतु शासनातर्फे हे अर्ज मंजूर झाले नाही. अर्ज केलेल्या नागरिकांनी अधिकृत कागदपत्रे दाखवले नसल्याने सरकारने अर्ज मंजूर केलेले नाहीत.गेल्या तीन महिन्यात आॅफलाइन अर्ज मोठ्या संख्येने आले आहेत. तसेच आॅफलाइन अर्ज मंजूरही करण्यात येत आहेत. मात्र, आॅनलाइन नळजोडणी प्रक्रि या फोल झाल्याचे दिसून येत आहे. नळजोडणीच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप सतत पालिका प्रशासनावर होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यानंतर व पालिका प्रशासनाच्या महासभेत झालेल्या बैठकीनंतर नळजोडणी प्रक्रिया आॅनलाइन करण्याचे महापालिकेने ठरवले होते.आॅनलाइन प्रक्रि या सुरु झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु आता ही प्रक्रि या फोल झालेली आहे. नागरिकांना आॅनलाइन नळजोडणीबाबत योग्य ती माहिती नसल्याने नागरिक अजूनही आॅफलाइन प्रक्रियेसाठी अर्ज करत आहेत.गेल्या काही महिन्यात पाच हजाराहून अधिक आॅफलाइन अर्ज आलेले आहेत. पालिकेतर्फे सुरु करण्यात आलेल्या उपक्रमाला यश मिळत नसल्याने अजूनही नागरिकांना नळजोडणी प्रक्रि येबाबत योग्य ती माहिती मिळत नसल्याचे दिसून येत आहे.नागरिकांपर्यंत माहिती पोहोचत नाहीआम्ही सतत वर्तमानपत्राद्वारे आॅनलाइन नळजोडणीचा प्रचार करत असतो. तरी देखील नागरिकांपर्यंत याची माहिती पाहचत नाही. पालिकेकडून सतत जनजागृती सुरु असते. तरी नागरिक अजूनही आॅफलाइन अर्जाला महत्व दिले जात आहे.- माधव जवादे, शहर अभियंता
ऑनलाइन नळजोडणीसाठी केवळ पाचच अर्ज झाले दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 10:52 PM