शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

फे्र ट रेल्वे कॉरिडोरला विरोध

By admin | Published: February 23, 2017 5:29 AM

फे्र ट रेल्वे कॉरि़डोर रद्द करण्यात यावा आणि वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात

वसई : फे्र ट रेल्वे कॉरि़डोर रद्द करण्यात यावा आणि वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी कॉ. गोदावरी परुळेकर मार्क्सवादी विचार मंचच्या वतीने बुधवारी वसईच्या प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. बुधवारी दुपारी चिमाजी अप्पा मैदानातून प्रांत कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. दिल्ली ते उरण दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे वसई पूर्व भागातील हजारो भूमिपुत्र विस्थापित होणार आहेत. महसूल विभाग व रेल्वे प्रशासनाने कोणतीही पूर्व कल्पना न देता जमिनीचे सातबारे रेल्वेच्या नावे केले आहेत. त्यामुळे भूमीपुत्राला भूमीहीन करणारा प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. बेरोजगारी, मासेमारी व्यवसायातील मंदी, कंत्राटी कामगाराची उपासमार थांबवावी, तुंगारेश्वर मंदिरात जाणाऱ्या भाविकांची होणारी अडवणूक थांबवावी व वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करावी आदी विविध प्रश्नावर सरकारला जाब विचारून मागण्या मांडण्यात आल्या. मोर्च्याच्या शिष्टमंडळाने प्रांतअधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पुढील मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार असल्याचे सांगण्यात आले. क्रांतिकारी मार्क्सवादी पक्ष,कॉ.गोदावरी परुळेकर मार्क्सवादी विचारमंच व जनसंघटना आदी मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. (वार्ताहर)