- हुसेन मेमनजव्हार : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पुलगाव इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आपल्या पाल्यांना पाठविण्यास पालकांनी नकार दिला आहे. या स्कूलमध्ये जव्हार प्रकल्पातील १५० आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र त्यांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याने, अनेक पालक आपली मुले घरी घेवून आले आहेत. पालकांच्या म्हणण्यानुसार आमची मुलंही त्या स्कूलमध्ये जाण्यास तयार नाहीत. तसेच हे स्कूल जव्हार पासून जवळपास ३०० कि.मी. अंतर लांब पडत आहे. त्यामुळे आम्हाला पालक मिटींगलाही वेळेत जाता येत नाही. त्यातच आमची गरिब परिस्थिती. यामुळे आमच्या पाल्यांना पालघर किंवा ठाणे जिल्ह्यातील नामांकित इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दाखल करावे. अशी मागणी पालकांनी प्रकल्प अधिका-यांकडे केली आहे.जव्हार प्रकल्प कार्यालयाकडून इंग्लिश मिडियम शिक्षणासाठी प्रत्येकी विद्यार्थ्यांची फी ५० ते ८० हजार रुपयांची फी आदिवासी विभागाकडून भरली जाते म्हणजे एका परिने इंग्रजी माध्यमातील शाळेतील पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण विद्यार्थ्यांना जणू मोफतच मिळते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून इंग्लिश मिडियम शाळेत विद्यार्थ्यांचे मृत्यू होणे, अल्पवयीन विद्यार्थींनींसोबत अश्लिल चाळे संस्थाचालकानेच करणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे इंग्लिश मिडियम शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. व्हार सारख्या दुर्गम भागातील मुलांना पालकांच्या इंग्लिश मिडियम शिक्षणासाठी पाठविण्यापेक्षा ठाणे पालघर नाशिक या जिल्ह्यातील शाळांची निवड का केली जात नाही. असा सवाल पालकांकडून विचारला जात आहे. विद्यार्थ्यांचे मृत्यू, शैक्षणकि आणि वसतिगृहात व्याविस्थत सुविधा नाहीत. यामुळे आमच्या मुलांना इंग्लिश शिक्षण घ्यावे, कि नाही असा प्रश्न पालकांना पडला आहे.येनेरे येथील शाळेचे सारेच संशयास्पदज्या येनेरे येथील शाळेत आदिवासी विद्यार्थीनींशी लैंगिक चाळे केले गेले ती शाळा १८ वर्षांपासून अस्तित्वात असून ती शाळा चालविणाºया संस्थेची सचिव हे चाळे करणाºया संस्थापक घोगरे याची पत्नीच आहे. अन्य कुणीही या संस्थेत असल्याचे फारसे ज्ञात नाही. स्थानिक आदिवासी संघटना या शाळेवर रविवारी मोर्चा काढणार आहेत.या शाळेने जे विद्यार्थी वसतीगृह साकारले आहे. ते अनधिकृत आहे. असेही तपासात उघड झाले आहे. शैक्षणिक संस्था ही नेहमी माध्यमांच्या संपर्कात असते परंतु ही शाळा आणि तिचे चालक मात्र कधीही माध्यमांच्या संपर्कात नसतात. या शाळेत स्थानिक मुले ८१ व बाहेरची आदिवासी मुले २५१ होती. २५१ मुले स्थलांतरीत केल्याने ही शाळा बंद पडल्यासारखी झाली आहे.
पुलगाव इंग्लिश स्कूलमध्ये पुन्हा विद्यार्थ्यांना पाठविण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2018 4:27 AM