शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

भीमा कोरेगावप्रकरणी दक्षतेचे आदेश, दलित संघटनांकडून बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 6:19 AM

भीमा कोरेगाव येथील झालेल्या हिंसाचाराचे पडसाद पालघर जिल्ह्यात उमटू नये ह्यासाठी पोलीस यंत्रणा सामोपचाराची भूमिका बजावत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ह्यासाठी सर्व प्रभारी अधिका-यांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण ह्यांनी दिली.

पालघर - भीमा कोरेगाव येथील झालेल्या हिंसाचाराचे पडसाद पालघर जिल्ह्यात उमटू नये ह्यासाठी पोलीस यंत्रणा सामोपचाराची भूमिका बजावत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये ह्यासाठी सर्व प्रभारी अधिका-यांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण ह्यांनी दिली. मात्र अनेक संघटनांनी एकत्र येत उद्या (३ जानेवारी) जिल्हा बंद ची हाक दिली आहे.भीमा कोरेगाव येथील शौर्य दिनाला २०० वर्ष पूर्ण झाल्याच्या पाशर््वभूमीवर मानवंदना देण्यासाठी जमलेल्या राज्यातील दलित बांधवावर काही विकृत शक्तींनी हल्ला केला करीत गाड्यांवर दगडफेक करीत जाळपोळ केली होती. ह्या घटनेत दोन लोकांचा मृत्यू होऊन अनेक लोक जखमी झाले आहेत. ह्याचे लोन पूर्ण राज्यात उमटल्या नंतर ह्या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून ह्या बाबत संपूर्ण तपास उच्च न्यायालयाला विनंती करून विद्यमान न्यायाधीशा मार्फत करणार असल्याचे मुख्यमंत्ती देवेंद्र फडणवीस ह्यांनी घोषित केले आहे. व मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना १० लाख रु पयांची मदत जाहीर केली आहे.ह्याचे पडसाद मुंबई येथेही उमटले असून रेल्वे रोको ही करण्यात आली होती. भारिप संघाने पूर्ण महाराष्ट्र बंद ची हाक दिल्या नंतर पालघर येथे झालेल्या रिपाई(आ), दलित पँथर, बंजारा टायगर्स, पालघर-डहाणू बौद्ध महासभा, भारतीय बौद्ध युवक संघ, दलित सेनाविविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष ह्यांनी पालघर मध्ये सभा घेऊन उद्या बंद ची हाक दिली आहे.तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही बंद ची हाक दिली आहे. तर मोखाडा येथे निषेध मोरच्यांचे आयोजन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. उद्या एसटी सेवा, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा व व्यवहार बंद राहणार असल्याचे संघटनांनी कळविले आहे. आठही तालुक्यातील पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाºयांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सर्व संवेदनशील जागांवर कुमक तैनात ठेवल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक चव्हाण ह्यांनी लोकमतला दिली.कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि जिल्ह्यात असा कुठलाही अघिटत प्रकार घडणार नाही ह्यासाठी पोलीस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. असेही त्यांनी सांगितले.मोखाड्यात कॉँग्रेसकडून निषेध रॅलीमोखाडा : भीमा-कोरेगाव येथे भीमसैनिकांवर झालेल्या हल्ल्याचा मंगळवारी कॉँग्रेस व बौद्ध समाजाच्यावतीने निषेध करण्यात आला. मोखाडा बस स्थानक ते तहसीलदार कार्यालय अशा निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करण्यात आली.रॅलीचे रुपांतर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सभेत झाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आरिफ मणियार यांनी भीमा-कोरेगाव येथील हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली. यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजू साळवे निषेध नोंदविला.याबाबतचे निवेदन मोखाडा तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष जमशेद लारा, जिल्हाध्यक्ष आरिफ मणियार, आरपीआयचे तालुका कार्याध्यक्ष संजय गायकवाड, आंबेडकर पॅँथर ग्रुपचे उपाध्यक्ष रमेश शिंदे, धमपाल शेजवळ, सदाम शेख, तेजस रोकडे, दत्तात्रय शिंद,े रमेश लामठे, उमेश गभाले, नितीन साळवे उपस्थित होते.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव