बोईसर : तारापूर एमआयडीसीतील जि. ७३ प्लॉट मधील ओरिएंट प्रेस या मोठया कारखान्यातील तडकाफडकी काढलेल्या कामगारांना पुन्हा कामावर न घेतल्यास मनसे तर्फेयेत्या बुधवारी कारखान्याच्या आवाराबाहेर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे माजी जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी शुक्रवारी कंपनी व्यवस्थापनाला दिला आहे.ओरिएंट प्रेस या कारखान्यामध्ये विजय भुतकडे, राजु वावरे, राजकुमार वर्मा, निवास पांडे हे चार कामगार मागील बारा वर्षांपासून कारखान्यामध्ये काम करीत होते. परंतु त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी कामावरून काढण्यात आले आहे. आज कारखान्याचे एच. आर. व अॅडमीन विभागाचे असिस्टंट मॅनेजर सचिन गुप्ता यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये जर उद्यापासून त्या कामगारांना कामावर पुन्हा पूर्ववत न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. या वेळी मनसेचे माजी जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या सह उपजिल्हाप्रमुख अनंत दळवी, मनसेच्या विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाप्रमुख धिरज गावड, पदाधिकारी विशाल जाधव, वैभव संखे, वैभव नाईक उपस्थित होते.
ओरिएंट प्रेसला मनसेचा अल्टिमेटम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 4:52 AM