वसई : वसई-विरार परीसरात सर्वत्र नाताळची धूम आहे. कार्निव्हलचा माहोल आहे. चर्च बेलचा निनाद, रोषणाई, आकाश कंदिल मास प्रेयर, शुभेच्छाची देवाण-घेवाण रस्त्याने मुलांना खाऊ, खेळणी वाटणारे सांता, जिंगल गीते गाणारी तरुणांची पथके असा सगळा आनंदी आनंद आहे. सगळीकडे दिवाळी सारखे वातावरण आहे. नोटबंदीचे कोणतेही सावट नाताळच्या उत्साहावर नाही. हे यावेळेचे वैशिष्ट्य. बाजारपेठेतही उत्साहाचा हा माहोल दिसून येतो आहे. चॉकलेट, केक आणि भेटवस्तू यांच्या खरेदीला उधाण आलेले आहे. वेगवेगळ्या चर्चेस मध्ये यानिमित्ताने अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजिले गेले आहेत. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभतो आहे. ३१ तारखेपर्यंत हा कार्निव्हलचा माहोल सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)
वसई-विरारमध्ये सर्वत्र नाताळची धूम
By admin | Published: December 26, 2016 6:07 AM