शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
2
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
3
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
5
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
6
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
7
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
8
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
9
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ
10
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
11
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
12
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
13
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
14
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
15
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
16
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
17
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
18
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
19
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
20
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

महापौर मॅरेथॉन गावाबाहेरूनच

By admin | Published: September 24, 2016 2:54 AM

यंदाची सहावी वसई विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा येत्या ११ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

वसई : यंदाची सहावी वसई विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा येत्या ११ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. मागच्या वर्षीचा विरोध लक्षात घेऊन वाद टाळण्यासाठी यंदा वसईतील गावांच्या बाहेरूनच स्पर्धेचा मार्ग ठेवण्यात आला आहे. १ हजारांहून अधिक व्यावसायिक आणि हौशी स्पर्धकांचा समावेश असलेल्या स्पर्धेत यावर्षी १८ हजारांहून अधिक स्पर्धक सहभाही होतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. यंदा ३५ लाखांहून अधिक बक्षिसे दिली जाणार आहेत. तर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील धावपटू यंदाही वसईत धावताना पहावयास मिळणार आहेत. वसई विरार महापौर मॅरेथॉनचे यंदाचे सहावे वर्ष असून यंदा मोठमोठ्या आयोजकांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. मागच्या वर्षी आयत्यावेळी गावातून विरोध झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर शेवटच्या वेळी स्पर्धेचा मार्ग बदलण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी गावांतून जाणारा मार्ग न ठेवता गेल्यावर्षी प्रमाणेच शहरांतूनच मार्ग ठेऊन वाद टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महापौर प्रवीणा ठाकूर यांच्या उपस्थितीत विरार येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी आमदार क्षितीज ठाकूर, आयु्नत सतीश लोखंडे, माजी महापौर राजीव पाटील, स्थायी समिती सभापती नितीन राऊत, सभागृह नेते फ्रान्सिस डिसोजा उपस्थित होते. पुरुष पूर्ण मॅरेथॉनच्या विजेत्याला अडीत लाखांचे बक्षिस दिले जाणार आहे. महिला व पुरुष अर्ध मॅरेथॉन विजेत्यास सव्वा लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. वसईतील विजेत्यांना खास बक्षिसे दिली जाणार आहेत. बाहेरून येणाऱ्या स्पर्धकांची वाहतूक, निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्पर्धकांना टाईमिंग चीप, रनिंग नंबर, फिनिशर मेडल्स, रेस फी फोटोग्राफ्स, ब्रेकफास्ट दिला जाणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेच्या मार्गावर वॉटर स्टेशन, एनर्जी ड्रिंक्स स्टेशन, कुल स्पंजींग, आॅरेंज स्टेशन, मेडिकल बेस कॅम्प, मेडिकल स्टेशन आणि दुचाकीवर डॉ्नटर व्यवस्था आणि रुग्णवाहिकेची सोय करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)>खेळाडूंची आॅनलाइन नोंदणी सुरूराष्ट्रीय पातळीवरील ही स्पर्धा ४२ किलोमीटर, २१ किलोमीटर तसेच ११ किलोमीटर स्त्री आणि पुरूष खुल्या गटात होणार आहे. या शिवाय पालघर जिल्ह्यातील १८ वर्षाखालील स्पर्धाकांसाठीही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या वर्षी या मॅरेथॉन स्पर्धेत १४ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. दुसऱ्याच वर्षी या मॅरेथॉनला राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्याची माहिती महापौर ठाकूर यांनी दिली. या वर्षी १८ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्पर्धेतील राष्ट्रीय खेळाडूंची आॅनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. इतर स्पर्धकांसाठी प्रवेश अर्ज पालिका मुख्यालयातून १५ आॅक्टोबर पासून वितरीत करण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबर ही अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख आहे. शालेय गटासाठी १ नोव्हेंबर पासून अर्ज देण्यात येणार आहेत. मॅरेथॉन पूर्वी शहरातील सर्व रस्त्याांची डागडुजी पूर्ण करून धावपटूंची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षात घेतली जाईल, आयुक्त सतीश लोखंडे यांनी सांगितले.>१ हजार व्यावसायिक खेळाडूंचा सहभागयंदाच्या स्पर्धेत १ हजार व्यावसायिक आणि हौशी खेळांडूंसह देशातील १८ हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होतील. तर अनेक मोठ्या कंपन्या आयोजक म्हणून सहभागी झाल्या आहेत. यशस्वी स्पर्धकांना ३५ लाखांहून अधिकची बक्षिसे दिली जाणार आहेत, अशी माहिती महापौर ठाकूर यांनी दिली. स्त्री भ्रूण हत्या टाळा व निसर्गाचा समतोल पाळा आणि क्लीन वसई, ग्रीन वसई हा संदेश स्पधेतून दिला जाणार आहे, असेही महापौर ठाकूर यांनी सांगितले.