सुनिल घरतपारोळ : वसई पूर्व भागातील पारोळ, माजिवली, देपिवली, तिल्हेर, शिरवली, घाटेघर, करजोंण, इ गावातील शेकडो एकर भातशेतीवर खोडकीड्याने भात पीकावर हल्ला केल्याने तोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने या भागातील बळीराजापुढे या वर्षी खावटीचा प्रश्न उभा राहिला आहे.या वर्षी पावसाने चांगली साथ दिली. भात लावणी ही हंगामातच झाली वेळोवेळी खताची तसेच औषधाची योग्य मात्रा ही दिली. या साठी शेतकºयांनी उसनवार करून खर्चही केला. भातशेती परवडत नसतांनाही वर्षभराच्या खावटीचा प्रश्न सुटावा यासाठी भात शेती केली. पण या हंगामात उभे पीक वाया गेल्याने कपाळाला हात लावायची वेळ आली आहे. तसेच या खोडकीडयाची संकरीत बियाण्याला लागण झाल्याने त्याबाबत शेतकरी साशंक आहेत.कोंदट, उष्ण वातावरणामुळे भातपिकांवर करपाचा प्रादुर्भावविक्रमगड : सद्यस्थितीत वातावरणात वारंवार बदल होत असून मध्येच झालेल्या परतीच्या पावसाच्या धुमाकुळाने वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे़ या कोंदट, उष्ण वातावरणामुळे भातपिकावर करपाचा प्रादूर्भाव झाला असून तालुक्यात याचा फैलाव होण्याअगोदरच प्रशासनाने योग्य खबरदारी घेणे जरुरीचे आहे़ बास्ते गावातील अनेक शेतक-यांच्या तसेच कुंर्झे येथील शेतकरी सुनिल मिठारा भोईर तर आपटी बु येथील शेतकरी संजय रुपजी डोले यांनी लागवड केलेल्या भाताच्या खाचरांमध्ये करपाने शिरकाव केला असून योग्य उपाययोजना न झाल्यास भाताचे संपूर्ण पिक नष्ट होईल असे त्यांनी सांगितले़ याबाबत तालुका कृषी कार्यालय व तहसिलदार यांच्याकडे तक्रारीही केलेल्या आहेत़या रोगामुळे तालुक्यातील १५ ते २० टक्के पिकांवर याचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून भातपिके २० टक्क्याहून अधिक घटण्याचा अंदाज बास्ते येथील शेतकरी व पोलिस पाटील सुभाष पाटील यांनी वर्तविला आहे़ रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे़ यामुळे हजारो रुपयांचे पिक नष्ट होण्याची शक्यता आहे. अनियमित पावसामुळे दरवर्षी नुकसान व्हायचे तर यंदा चांगले पिक हाती येत आहे असे दिसत असतांना शेवटच्या घडीला रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विक्रमगड तालुक्यात पावसाळी शेतीवरच ९० टक्के शेतक-यांचा उदरनिर्वाह चालतो़ त्यामुळे शेतकºयांना मदत करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यांत येत आहे़- सुनिल मिठाराम भोईर,पिडीत शेतकरी, कुर्झे
पारोळ परिसरात भातशेतीवर खोडकिडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 1:12 AM