पालघर : माकूणसार खाडीतील तिवरांची लागवड करण्यासाठी वन विभागाने खोदलेल्या चरा मुळे खाडीचे पाणी भातशेतीमध्ये घुसून अनेक शेतक-यांच्या जमिनी नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे.केळवे-सफाळे मार्गावरील माकुणसार खाडी पुलाजवळील पूर्वेकडील भूखंडावर आणि माकूणसार गावात वन विभागामार्फत तिवरांची रोपे लागवडीचे काम सुरू आहे. त्यांच्या लागवडीसाठी खाºया पाण्याची गरज असल्याने पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी वन विभागाने अजब मार्ग शोधला आहे. खाडी क्षेत्रातील अनेक ठिकाणावर जेसीबी मशीनच्या सहाय्याने मोठे मोठे चर खोदले आहेत. या नाल्यांमुळे माकुणसार खाडी पात्र गावच्या सुपीक जमिनीच्या जवळ आणल्याचा आरोप गांवकरी आणि शेतकºयांनी केला आहे.कांदळवन असलेल्या जमिनीच्या शेजारीच गावातील शेतकºयांच्या जमिनी असून त्यावर दरवर्षी भाताचे पीक घेतले जाते. परंतु वन विभागाने या संपूर्ण भूखंडावर चर खोदल्याने खाडीचे पाणी त्यामधून पूर्ण शेतीवर पसरून ती जमीन आता नापीक होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत, तसेच या चरामधील खारे पाणी जमिनीत मुरून भूगर्भातील पेयजलाचे स्त्रोतही खारट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने केलेल्या या खोदकामाविरोधात ग्रामस्थांनी ग्रामसभेत मोठ्या संख्येने रोष व्यक्त करून या विरोधात ठराव मंजूर केला. पालघरच्या जिल्हाधिकाºयाना या संदर्भात निवेदन देण्यात आले असून उपाय योजण्याची मागणी केली आहे. करण्यात आली आहे.
खाडीच्या पाण्याने भातशेती नापिक होण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:33 AM