शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भाताची कापणी मजुरांअभावी खोळंबणार

By admin | Published: October 28, 2015 12:44 AM

कमी तसेच अनियमीतपणे पडलेल्या पावसानंतरही भातपीकांनी शेतजमीन फुलून गेली असून तयार झालेल्या भातपीकांची कापणी मजुराविना खोळंबण्याची शक्यता आहे.

बोईसर : कमी तसेच अनियमीतपणे पडलेल्या पावसानंतरही भातपीकांनी शेतजमीन फुलून गेली असून तयार झालेल्या भातपीकांची कापणी मजुराविना खोळंबण्याची शक्यता आहे. संध्याकाळी तयार होणारे ढगाळ वातावरण बळीराजाची चिंता वाढवित आहे.पालघर तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे ११७८२४ हेक्टर असून त्यापैकी सुमारे १६ हजार २२२.८४ हेक्टर क्षेत्रफळावर भातलागवड करण्यात आली होती. त्यामध्ये ८ हजार ८३८ हेक्टर क्षेत्रफळावर हळवे, २ हजार ४९ हेक्टर क्षेत्रफळावर गरवे तर ४ हजार १५२ हेक्टर क्षेत्रफळावर निमगरवे भाताचे पीक घेण्यात आले आहे. जून महिन्यात पावसाने दमदार आगमन केल्यानंतर प्रथम भात बी पेरणी खोळंबली. त्यानंतर पावसाच्या दिर्घ विश्रांतीमुळे भातपीकांच्या कामाची गणीतेच कोलमडून पडली. त्या ही परिस्थितीत शेतकऱ्यांनी निसर्गाच्या लहरीपणावर मात करून भातपीकांना जोमाने वाढवून शेतजमीन फुलविली.परंपरागत कामे करणारे शेतमजूर व जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी इ. भागातून येणारे मजूरांवर भातपीकांची कापणी ही प्रामुख्याने अवलंबून असते. परंतु स्थानिक शेतमजूरांची दिवसेंदिवस कमी होत असलेली संख्या तसेच दुर्गम भागातूनही मजूर पुरेशा संख्येने पालघर तालुक्यात येत नसल्याने शेतमजूरांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. दुर्गम भागातून येणारे मजूर हे दिवाळीपूर्वी परतीच्या प्रवासाला लागत असल्याने आता जे उपलब्ध होतील त्यांची मनधरणी करून लवकरात लवकर भातकापणी आटोपून घेण्याच्या प्रयत्नात शेतकरी आहेत. (वार्ताहर)यंदा पावसाची ओढ, भातपिकावरील रोग यामुळे पिकांची उगवणी लांबणीवर पडली असली तरी परतीच्या पावसाने भातपिके थोडीफार तरारली. उंची कमी असल्याने यंदा गवत-पावोलीचा उतारा कमी मिळेल, असे सुभाष देसले यांचे म्हणणे आहे. बळीराजाने भातझोडणीला सुरुवात केली आहे. आॅक्टोबर हीट वाढली तरी पाऊस येण्याची शक्यता असून कापलेल्या भाताच्या उडव्यावर प्लॅस्टिक अंथरले जात आहे.भातकापणीस जर उशीर झाला तर दिवसभरातील कडक उन्हामुळे भातामधील तांदळाचा दाणा टणक बनून दाणा तुटण्याची शक्यता अधिक असल्याने ठराविक वेळेत भातकापणी झाली नाही तर शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे.