पारोळ - वसई तालुक्यात पावसाने महिनाभर विश्रांती घेतल्याने व भातलावणीसाठी लागणारा पाऊस पडत नसल्याने बळीराजाने भातलावणीचा हंगाम हातचा जाऊ नये म्हणून नदी, विहिरी, बोअरवेल, नाले या पाण्याच्या स्रोतांतील पाणी पंपाने खेचून भातलावणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे बियाणे, खते, मजूर, औषधे, ट्रॅक्टरचे भाडे याबरोबर आता पाण्यासाठी इंजिनाच्या खर्चामध्ये या वर्षी वाढ झाली असल्याने बळीराजा आर्थिक पेचात सापडला आहे.वसई पश्चिम व पूर्व भागांत शेकडो हेक्टर भातपीक पावसाळ्यात घेतले जाते. पण, गेल्या तीन वर्षांपासून बळीराजाला निसर्ग साथ देत नसल्याने त्यांच्यावर आता कृत्रिम पाणी घेऊन भातशेती करण्याची वेळ आली आहे. भातरोप तयार असतानाही पावसाने ओढ दिल्याने लावणी कशी करावी, हा प्रश्न बळीराजाला पडला. कारण, हलवे व निमगरवे पिकांचा लावणीचा हंगाम जाऊ लागल्याने काहींनी भातशेती न करण्याचा विचार केला आहे. तसेच लावणी केली, आणि पुढे जर पाऊस पडला नाही तर पिकाला पाणी कुठून द्यावे, हाही प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
पंप लावून भाताची लागवड
By admin | Published: July 20, 2015 3:12 AM