वसई - मुसळधार पावसाने आज राज्यातील बहुतांस भागाला झोडपून काढलं आहे. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील वसईजवळील चाळीस पाडा येथे शेतीच्या कामासाठी गेलेले १६ जण ता पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. सदरच्या घटनेबाबत महसूल विभागास माहिती मिळताच महसूल विभागामार्फत NDRF व अग्निशमन दल यांना सदरची माहिती दिली. त्यानंतर १६ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली.
याबाबत मिळालेल्या दिनांक ७ जुलै रोजी मौजे सायवन चाळीस पाडा ता.वसई , जि. पालघर येथील १६ माणसे ( स्त्री व पुरुष ) शेतीच्या कामासाठी तानसा नदीशेजारी शेतामध्ये सकाळी ७च्या सुमारास गेली होती. शेतामध्ये काम करत असताना सकाळी ११च्या सुमरास तानसा नदीला अचानक तानसा धरणातून पाणी आल्याने सदरची १६ माणसे अचानक शेतामध्ये अडकली. सदरच्या घटनेबाबत १२:३० वाजता महसूल विभागास माहिती मिळताच महसूल विभागामार्फत NDRF व अग्निशमन दल यांना सदरची माहिती दिली व बचाव कार्यासाठी बोलावण्यात आले.
सदरची अग्निशमन दल हे १:३० वाजता हजर झाले. त्यांनी बचावकार्य चालू केले तर NDRF टीम १:४० वाजता घटनास्थळी हजर झाले. आतापर्यंत ८ स्त्रिया व ८ पुरुष सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही. सदरचे बचावकार्य 2.50 वाजता संपले.