शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यांनंतर सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 6:39 AM

जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी गावकरी घाबरले आहेत.

पालघर - जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून बसत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांनी गावकरी घाबरले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत रहिवाशांशी संवाद साधला. सर्व संबंधित यंत्रणांना दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत.कुर्झे धरण, अणुऊर्जा प्रकल्प यांना धोका नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. तंबू बसविलेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी शनिवारी रहिवाशांशी संवाद साधला आणि प्रशासन त्यांच्यासोबत असल्याचा दिलासा दिला.नाशिक येथील धरण सुरक्षा मंडळाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाला सविस्तर पाहणीसाठी बोलावण्यात आले आहे. तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाचे डिझाईन देखील भूकंपरोधक असल्याने त्या प्रकल्पाला देखील कोणताही धोका संभवत नसल्याचे त्यांनी सांगितले.एनडीआरएफची तुकडी शनिवारी या भागात दाखल झाली असून रहिवाशांच्या निवाºयासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून संबंधित गावांमध्ये २०० तंबू उभारण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हा प्रशासनाच्या वतीने ७० ते ८० जण एकत्रित राहू शकतील, असे मोठे तंबू उभारण्यात आले आहेत. तीन रूग्णवाहिकांसह आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून पोलीस रात्रीची गस्तही घालत आहे.सोय गावासाठी, क्षमता कुटुंबाचीडहाणू, तलासरी तालुक्यातील काही गावांना तीन महिन्यांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असल्याने सुरक्षेची उपाययोजना म्हणून शासनाने धुंदलवाडी, दापचारी येथे प्रत्येक पाड्यात १० बाय १२ चे तंबू ठोकून जवाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.या तंबूत कुटुंबातील केवळ सात ते आठ सदस्य राहू शकत असल्याची प्रतिक्रि या धुंदलवाडीच्या ग्रामस्थांनी दिली आहे.भूकंप पीडित मदतीच्या प्रतीक्षेतशुक्रवारी दुपारी बसलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्याने मुंबई अहमदाबाद हायवे लगत असलेल्या हळद पाडा, खिवरपाडा येथे भयभीत होऊन पळत असताना वैभवी रमेश भूयाल या दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. पण दोन दिवसानंतरही आमच्या घराकडे शासकीय यंत्रणा फिरकलेली नाही तसेच कोणतीही मदत मिळालेली नसल्याचे पीडित कुटुंबाने सांगतिले.

टॅग्स :palgharपालघर