हितेन नाईकराज्यात पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सोमवारी झालेली पोटनिवडणूक मतदान यंत्रांच्या बिघाडामुळे गाजली. यामुळे ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह लागले आहे. कडक उन्हातही मतदानासाठी मतदार आले खरे, परंतु अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याने त्यांचा हिरमोड झाला. प्रशासनाने धावपळ करीत ही यंत्रे सुरू केली. मात्र त्यामध्ये बराच वेळ निघून गेल्याने मतदानाचा टक्का घसरला. दिवसभराच्या गोंधळामुळे विरोधी पक्षांनी फेरमतदानाची मागणी केली आहे.पालघर : पोटनिवडणुकीत मतदान यंत्रे बंद पडण्याच्या प्रकाराबाबत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी तीव्र संताप व्यक्त केला. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आखलेला हा रडीचा डाव असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षांनी दिली. तर हा सारा निवडणूक आयोगाचा दोष असल्याचे म्हणत, भाजपाने याचे खापर निवडणूक आयोगावरफोडले.शिवसेनेचे प्रचारमोहीम प्रमुख आणि पालघरचे संपर्क नेते रवींद्र फाटक ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, एकीकडे मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोग मोहिमा राबवित असताना, दुसरीकडे मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रेच बंद पडणे हास्यास्पद आहे. प्रत्यक्ष बॅलेट पेपरनेच मतदान घेणे योग्य ठरेल. सगळ्याच पक्षांची ही मागणी आहे. तिचा आयोगाने गंभीरपणे विचार करावा. मतदानाची वेळ वाढवून देऊ, असे जरी निवडणूक अधिकारी म्हणत असले तरी एकदा माघारी फिरलेला मतदार पुन्हा मतदान केंद्रात येणे अथवा आणणे अवघड असते.भाजपाच्या प्रचार यंत्रणेचे पालघर विधानसभा मतदारसंघाचे सूत्रधार आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, ही यंत्रे बंद पडण्याचा फटका सगळ्याच पक्षांना बसणार आहे. निवडणूक आयोगाने या यंत्रांच्या सुस्थितीची पाहणी आधी का केली नाही, असा आमचाही सवाल आहे....हा तर रडीचा डावपराभव दिसू लागल्यामुळे हा रडीचा डाव कोण खेळतो आहे हे जनतेला कळायला पाहिजे. वसई, विरार, नालासोपारा हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला आहे. नेमक्या त्याच ठिकाणी असंख्य मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे कशी बंद होतात? तीही मतदानाच्या प्रारंभीच? हा एकापरीने मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत.-हितेंद्र ठाकूर,आमदार, बहुजन विकास आघाडीनिवडणूक अधिकारी म्हणतात, वेळ वाढवून देऊअनेक केंद्रांवरील मतदान यंत्रे बंद पडल्यामुळे वाया गेलेल्या वेळेइतकी मतदानाची वेळ वाढवून देऊ असे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले आहे. परंतु जे मतदार मतदान न करता परत गेले ते परत येतील का?- दामू शिंगडा,काँग्रेसचे उमेदवारबॅलेट पेपर व्होटिंग सिस्टीम योग्यअनेक केंद्रांवरील मतदान यंत्रे बंद पडल्यामुळे वाया गेलेल्या वेळेइतकी मतदानाची वेळ वाढवून देऊ, असे जिल्हाधिकाºयांनी आम्हाला सांगितले आहे. परंतु, जे मतदार मतदान न करता परत गेले ते पुन्हा येतील का? याची शाश्वती कोणीच देऊ शकणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा बॅलेट पेपर व्होटिंग सिस्टीम सुरू करावी, असे आमचे मत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पालघर/भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : मतदान यंत्रांचा फज्जा, सर्वपक्षीय नेते संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 6:15 AM