पालघर : पावसाळ्यामध्ये धबधबे, धरणे, तलाव किंवा नदी परिसरात फिरायला जाण्याच्या अनेकांच्या प्लॅनचा पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या मनाई आदेशाने विचका होणार आहे. ६ सप्टेंबरपर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात पावसाने जोरदार सुरूवात केल्याने नदी, नाले, धरणे, तुडुंब भरली आहेत. तसेच हिरवाईची चादर पसरलेल्या या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक कुटुंबांनी, मित्रांनी शनिवार-रविवार या विकेंडचे प्लॅनिंग केले. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकामुळे या प्लॅनिंगचा विचका झाला आहे. जिल्ह्यातील १५ धबधबे, तलाव किंवा धरणांच्या सभोवताली एक किलोमीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.>धबधबा-धरणांवर काय करण्यास मनाई?१. पावसामुळे वेगाने वाहणाºया पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे आणि त्यामध्ये पोहणे.२. धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.३. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दºयांचे कठडे, धोकादायक वळणे अशा ठिकाणी सेल्फी काढणे किंवा कोणत्याही स्वरु पाचे चित्रीकरण करणे४. पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्र ी करणे आणि उघड्यावर मद्य सेवन करणे५. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे६. वाहन अतिवेगाने चालवणे तसेच वाहतुकीस परिणाम होईल अशा प्रकारे वाहने चालवणे७. वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे८. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉल आणि प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे.९. सार्वजनिक ठिकाणी येणाºया महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य आणि अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे किंवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे१०. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डीजे सिस्टीम वाजवणे, गाडीमधील स्पीकर, उफर वाजवणे आणि त्यामुळे ध्वनी प्रदूषण करणे११. ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू आणि जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे.>कोणकोणते धबधबे, तलाव आणि धरणे?१) काळमांढवी धबधबा, केळीचा पाडा, ता.जव्हार२) हिरडपाडा धबधबा, ता.जव्हार३) दाभोसा धबधबा, ता.जव्हार४) डोम विहीरा खडखड धरण, ता.जव्हार५) पळूचा धबधबा, साखरा, ता.विक्र मगड६) वाघोबा खिंड धबधबा, ता.पालघर७) ऐना दाभोण धबधबा, बोईसर८) पडघा, बोईसर धबधबा९) देवखोप धरण, पालघर१०) तांदुळवाडी धबधबा, सफाळा, ता.पालघर११) झांझरोळी धरण, केळवारोड पूर्व, ता.पालघर१२) चिंचोटी धबधबा, वसई१३) तुंगारेश्वर धबधबा, वसई१४) वांद्री धरण, गांजे ढेकाळे, ता.पालघर१५) तिळमाळचा धबधबा, वडपाडापरळी, ता.वाडा
पालघरमधील धरणे, तलाव, धबधब्यात उतरण्यास 6 सप्टेंबरपर्यंत मज्जाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 12:18 AM