शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पालघर जिल्हा पर्यटनाचे कंबरडे मोडले, जिल्हाधिकाऱ्यांचा तुघलकी आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 2:57 AM

पर्यटन वाढीद्वारे रोजगार निर्माण करण्यासाठी शासन काट्यवधी रु पयांचा खर्च एके ठिकाणी करीत असताना पालघर जिल्हाधिका-यांनी ३१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे, धबधबे, धरणे आदीं पासून १ किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित भाग म्हणून घोषित करीत पर्यटकांना बंदी घातली आहे.

पालघर - पर्यटन वाढीद्वारे रोजगार निर्माण करण्यासाठी शासन काट्यवधी रु पयांचा खर्च एके ठिकाणी करीत असताना पालघर जिल्हाधिका-यांनी ३१ जुलै पर्यंत जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे, धबधबे, धरणे आदीं पासून १ किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित भाग म्हणून घोषित करीत पर्यटकांना बंदी घातली आहे. पर्यटन स्थळी बंदोबस्त, सोयीसुविधा निर्माण करणे गरजेचे असताना उलट त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात आल्याने पर्यटकामध्ये मोठी नाराजी पसरली आहे.शासन एके ठिकाणी राज्यात लोकांचा हॅपिनेस इंडेक्स वाढविण्यासाठी प्रयत्नशील असताना आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन फंडातून वार्षिक ६ कोटींचा निधी खर्च करीत असताना जिल्हाधिकाºयांनी १९७३ चे कलमान्वये १४४ चे आदेश जारी केले आहेत. धरणे, धबधबे, तलाव आदी ठिकाणा पासून १ किमी चा परिसर प्रतिबंधित भाग म्हणून घोषित करण्यात आला असून सप्टेबर पर्यंत हा मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा निर्णय तुघलकी निर्णय असल्याच्या प्रतिक्रि या पर्यटन प्रेमी मधून उमटत आहेत.वसई येथील चिंचोटी धबधब्यावर प्रत्येक वर्षी प्रमाणे विकेंड साजरा करण्यासाठी गेलेले १०० हुन अधिक पर्यटक अडकून पडल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला असला तरी अचानक मुसळधार पावसाचा वेग वाढून धबधब्याचा प्रवाह वाढल्याने चिंचोटी येथे पर्यटक अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने बंदोबस्त ठेवून पर्यटकांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असताना जमाव बंदीची (कलम १४४) भिती घालून पर्यटकांना रोखण्यात आल्याने तीव्र प्रतिक्रि या उमटत आहेत.काश्मीर मधून वर्षभर अस्थिर वातावरण राहून अनेक अतिरेकी कारवाया होत असताना शासन मग काश्मिरातील पर्यटन स्थळे बंद करते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील जव्हार हे मिनी माथेरान म्हणून सर्वत्र परिचित असून वर्षाचे बाराही महिने इथे पर्यटकांचा राबता असतो. काळमांडवी, केळीचा पाडा, हिरड पाडा, दाभोसा आदी ओथंबून वाहणारे धबधबे, खडखड सारखे निसर्गाचे नयनरम्य ठिकाण असलेले धरण पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. तसेच विक्र मगड मधील पलूचा धबधबा, पालघर मधील वाघोबा खिंड धबधबा, झंजरोली, गांजे ढेकाळे धरण, बोईसर चे ऐना, दाभोन धबधबे, वसई तील चिंचोटी, तुंगारेश्वर धबधबे, वाड्यातील तिळमाळ धबधबा, ही स्थाने पर्यटकांसाठी पावसाळ्यातील विकेंड साजरी करण्यासाठी पर्वणीचे ठरतात. त्यामुळे कुटुंबीय, तरु णांचे ग्रुप, वर्षा सहली वाले मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात.निसर्गाचा आस्वाद घेत असताना काही धांगडधिंगा करणारे ग्रुप या ठिकाणच्या मजेत व्यत्यय आणीत असले तरी सरसकट सर्व पर्यटक प्रेमींना दोन महिन्यासाठी या सर्व बाबी पासून दूर ठेवणे ही काही उपाय योजना नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे.प्रतिबंधित करण्यात आलेली सर्व ठिकाणे ही आदिवासी बहुल भागातील असल्याने रानावनात पिकविलेला कंटोळी, शेवळा, कुवारीची भाजी, काकडी, फळे, फुले आदी भाजीपाला आदिवासी बांधव या पर्यटकांना विकून त्यातुन आपला रोजगार मिळवत असतो. तर काही ठिकाणी आदिवासी तरु णांनी छोटी छोटी दुकाने टाकून वडा पाव, भजी, चहा, कोल्ड ड्रिंक्स, आदी व्यवसायाद्वारे रोजगार मिळविण्याचा प्रयत्न असताना या निर्णया मुळे या सर्वांचा रोजगार बुडुन पर्यटन वाढीच्या प्रयत्नांना खीळ बसून कोट्यवधी रु पयांचा खर्च केलेला निधी वाया जाऊ शकतो. त्यामुळे प्रतिबंधित ठिकाणावर चोख बंदोबस्त ठेवून हुल्लडबाजी करणाºयावर चाप आणण्यासाठी उपाय योजना करुन पर्यटकांना निसर्गाचा आनंद उपभोगण्या पासून जिल्हाधिकाºयांनी रोखून न धरता दिलेले आदेश मागे घ्यावेत अशी मागणी पर्यटका मधून केली जात आहे.सरकारी धोरणा विरोधात आदेशपर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन फंडातून वार्षिक ६ कोटींचा निधी खर्च करीत असते पालघर जिल्ह्यामध्ये पर्यटनाला तेवढी उर्जा मिळाली नसली तरी हजारो आदिवासींना या आदेशामुळे आपल्या रोजगाराला मुकावे लागणार आहे.विकेंड साजरा करण्यासाठी गेलेले पर्यटक अडकून पडल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला असला तरी मुसळधार पावसाचा वेग वाढून धबधब्याचा प्रवाह वाढल्याने चिंचोटी येथे पर्यटक अडकल्याची माहिती पुढे आली आहे.हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तिवल्या नंतर काही दिवसा पुरता बंदी असावी.सरसकट बंदी न घालता जिल्हा प्रशासनाने ग्रामदक्षता कमिटी,पोलीस ह्यांच्या प्रयत्नाने हुल्लडबाजी वर नियंत्रण राखावे.-प्रा. भूषण भोईर, पालघरपर्यटन विकासाच्या घोषणा करायच्या मात्र पुरेशा सोयीसुविधा न पुरवीत कलम 144 ची अंमलबजावणी म्हणजे तुघलकी निर्णय झाला.पर्यटन इंडस्ट्री द्वारे स्थानिकांना,हॉटेल व्यावसायिकांना मोठा रोजगार निर्माण होत असल्याने हा निर्णय मागे घेऊन वाईट गोष्टींना आळा घालावा.- डॉ. दीपक भाते, सफाळे 

टॅग्स :palgharपालघरtourismपर्यटन