वसई : परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात यंदा वर्षी पाऊस कमी झाल्याने अनेक शेतकरी पोटाची खळगी भरण्यासाठी पालघर जिल्हात रोजंदारीसाठी दाखल झाले आहे. परभणी मधील जवळा बाजार, हिंगोली मधील गणेशपूर, गोंडल, जाम्ब, वटकली, नांदेड मधील हदगाव तालुक्यातील म्हाताला, न्यूघा, चक्री, मुदखेड डोणगाव, पिंपळखुटा गोपाळवाडी, दरेगाव वाडी, या ठिकाणची ३५ ते ४० कुटुंबे वसई, विरार, नालासोपारा परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी रोजगाराच्या शोधात आली आहेत. नालासोपाऱ्यात आचोळे तलाव, आचोळे गाव, संतोषभुवन, निळेगाव, अग्रवाल, आंबेडकर नगर या ठिकाणी खोली भाड्याने घेऊन राहत आहेत.
गावामध्ये काम नाही म्हणून मुंबईला आलोत, मला तीन मुलं आहेत. नाक्यावर सकाळी उभे राहून कामाच्या शोधात असतो, आठवड्यातून २ दिवस काम मिळते, महागाईमुळे मिळणाºया रोजगारात भागातही नाही, शेवटी एखाद्यावेळी आमच्याकडे धान्य आणायला आणि खोलीचे भाडे देण्यासही पैसे नसतात. शासनाने आमच्या रोजगारासाठी काही तरी करणे गरजेचे आहे अशा प्रतिक्रि या परभणीच्या जिंतूर तालुक्यातील तांड्यावरच्या जनाबाई मोरे यांनी सांगितले. नांदेड मधील पिंगळी गावचे सूर्यभान, उषा भोसले, हे आपल्या ५ महिन्याच्या बाळाला सोबत घेऊनच खोदकाम करतात. शेती नापीक झाली, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर पूर्णपणे करपून गेली, पेरणीसाठी टाकलेले पैसेही पाण्यात गेले, आणि शेवटी कर्जबाजारी झालो. अशी त्यांची व्यथा आहे.तर भुकेपोटीच मेलो असतोगावात राहिलो असतो तर आता जेवढे काही किडूक मिडूक रोजगारातून मिळते तेवढेही मिळाले नसते. म्हणून पोटासाठी गाव सोडून रोजगाराच्या शोधात आम्ही मुंबई गाठली आहे. इथेही नाक्यावर कामासाठी थाबवून रोजगार शोधत असता अशी व्यथा नांदेडचे अर्जुन गव्हाणे यांनी लोकमतकडे मांडली.