पालघर : अनेक गंभीर प्रश्ना विरोधात भूमीसेना-आदिवासी एकता परिषदेने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चाच्या वेळी काही मोर्चेकऱ्यांनी हातगाडीवाले, वडापाववाले यांची लूट करून सामानाची मोडतोड केल्याची तक्र ार पालघर पोलीस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली आहे.पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेन्स,वाढवणं बंदर,मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस महामार्ग,फ्रेंट कॉरिडोर ई. विनाशकारी प्रकल्प राबविले जात असल्याच्या निषेधार्थ भूमीसेना-एकता परिषदेच्या वतीने २७मार्च रोजी पालघरच्या चार रस्त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर ८ ते ९ हजारांचा मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी काही मोर्चेकऱ्यांनी वडा पाव,ऊसाचा रस, चहा, कलिंगड यावर ताव मारला, पैसे दिले नाही. शिवाय गल्ल्यातील रक्कम चोरून नेली अशी तक्रार भूषण दूतकर, सुभेदार यादव,आशिष यादव, विनय यादव, निरांजन यादव, सीताराम यादव, राज ठाकूर,पप्पू यादव,राम परवेश यादव, राकेश हरजिन, मोहनसिंग कुमावत, ईश्विरसंग कुदेवडा, लक्ष्मी पटेल ई नी केली आहे. या लुटमारीत आपले १ लाखांचे नुकसानही झाल्याचे तक्र ारदाराचे म्हणणे आहे.ह्या मोर्च्या दरम्यान वाट काढीत पुढे जाणार्या काही लोकांनाही मारहाण करण्यात आली असून वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही यावेळी मद्यपान केलेल्या काही मोर्चेकरांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पालघर पोलिसांनी भूमीसेना आणि एकता परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलाविल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)
पालघरमध्ये मोर्चेकऱ्यांनी केली लूटमार
By admin | Published: March 31, 2017 5:30 AM