शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पालघरमध्ये नवे ७२ हजार मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:52 IST

सर्वाधिक मतदार नालासोपारा तर सर्वात कमी विक्रमगडमध्ये

पालघर : पालघर लोकसभा मतदार संघात ३१ मार्च पर्यंत झालेल्या नवीन नोंदणीत ७२ हजार ३१४ नवीन मतदारांची नोंद करण्यात आली असून आता नव्या मतदार यादी नुसार या मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या १८ लाख ८५ हजार २९७ एवढी झाली आहे. त्यात पुरु ष ९ लाख ८९ हजार तर महिला ९ लाख ९६ हजार १८६ तर अन्य तृतीयपंथी १११ असल्याची अंतिम नोंद करण्यात आली आहे.२९ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ९ एप्रिलपर्यंत नवीन मतदारांची नोंद करण्या बरोबरच मृत पावलेल्या मतदारांचे नाव कमी करण्याची प्रक्रि या निवडणूक निर्णय अधिकाºयाकडून राबविण्यात आली होती. जिल्ह्यातील सहा विधानसभा निहाय मतदान केंद्रातर्गत १ जानेवारी ते ९ एप्रिल २०१९ दरम्यान वाढलेल्या मतदारांची ५४ हजारांची वाढ झाल्यानंतर पालघर लोकसभा निवडणुकीत सहभागी मतदारांची अंतिम संख्या जाहीर करण्यात आली आहे.पालघर, बोईसर, डहाणू, विक्रमगड, नालासोपारा व वसई अशा सहा विधानसभा मतदार संघांपैकी नालासोपारा विधानसभेत सर्वाधिक ४ लाख ८७ हजार ५६० मतदारांची नोंद करण्यात आली असून सर्वाधिक कमी मतदार संख्या विक्र मगड मतदार संघात २ लाख ६४ हजार १३२ इतकी नोंदविण्यात आली आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार असलेल्या आणि त्यांचे प्राबल्य असलेल्या बोईसर, नालासोपारा व वसई या तीन मतदार संघातच १० लाख ८० हजार १० मतदारांची नोंद झाल्याने एकूण मतदार संख्येच्या ५७ टक्के एवढी मतदार संख्या या मतदार संघात समाविष्ट आहे. तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत २१ नी वाढ झाली असून ती १११ झाली आहे तर लष्कराशी संबंधित ३०७ मतदारांची नोंद करण्यात आलेली आहे.पालघर लोकसभा अंतर्गत डहाणू विधानसभा क्षेत्रात पुरु ष १ लाख ३६ हजार १०६ तर महिला १ लाख ३३ हजार ८७४ अन्य ८ असे एकूण २ लाख ६९ हजार ९८८ मतदारांची नोंद करण्यात आली असून तर मतदार केंद्रे ३२७ आहेत. विक्र मगड विधानसभा क्षेत्रात पुरु ष १ लाख ३३ हजार ७५३, महिला १ लाख ३० हजार ३७९ असे एकूण २ लाख ६४ हजार १३२ मतदारांची नोंद असून एकूण ३४८ केंद्रे आहेत. पालघर विधानसभा क्षेत्रात पुरु ष १ लाख ३७ हजार ८३८ तर महिला १ लाख ३३ हजार ३१३ अशी एकूण २ लाख ७१ हजार १६७ मतदारांची नोंद असून अन्य १६ तर ३२२ केंद्र आहेत. बोईसर विधानसभा क्षेत्रात पुरु ष १ लाख ६० हजार ७९९, महिला १ लाख ३७ हजार ०९२ असे एकूण २ लाख ९७ हजार ९१५, अन्य २४ तर एकूण ३५३ मतदार केंद्रे आहेत, नालासोपारा विधानसभेत पुरु ष २ लाख ६८ हजार ७००, महिला २ लाख १८ हजार ८०४ अन्य ५६ असे एकूण ४ लाख ८७ हजार ५६० मतदार असून एकूण मतदान केंद्रे ४८९ आहेत, वसई विधानसभा क्षेत्रात पुरु ष १ लाख ५१ हजार ८०४ , महिला १ लाख ४२ हजार ७२४ अन्य ७ असे एकूण २ लाख ९४ हजार ५३५ मतदार असून एकूण मतदानकेंद्रे ३३८ आहेत. जिल्ह्यात एकूण २ हजार १७७ मतदान केंद्रे आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर