लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पालघर जिल्हा मुख्यालय व पालघर नवनगर वसविण्याचे काम सिडकोकडून होणार आहे. त्यामधील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या निविदा मान्यतेसाठी सिडकोच्या समितीकडे ठेवण्यात येणार असून पावसाळ्यानंतर ही कामे सुरु होणार आहेत. या जागेची पाहणी करण्यासाठी बुधवारी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी पालघरला भेट दिली. अशी माहिती जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी पत्रकारांना दिली.गगराणी यांनी त्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह आमदार व जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबतीत चर्चा केली. या मुख्यालयांना चांगल्या पद्धतीने विकसित करण्यात येणार असून इथे वसणारे नवनगर हे स्मार्ट सिटी प्रमाणे असेल. ४४० हेक्टर पैकी १०३ हेक्टर क्षेत्रात मुख्यालयाचे निर्माण होणार असून पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्था, पावसाचे पाणी वाहण्यासाठीच्या व्यवस्थेचा विचार या आराखड्यात केला असल्याचे ते म्हणाले. पाणी पुरवठ्यासाठी भविष्याचा विचार करून त्यापद्धतीची आखणी करीत असून यासाठी पिंजाळ किंवा सुर्यातून ते पाणी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी होणारी रहदारी वाहतूक व लोकसंख्या लक्षात घेऊन प्रशस्त मुख्य रस्ते व त्यांना जोडणाऱ्या रस्त्याचे सुसूत्रीत जाळे उभारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. भविष्यात आज नाही तर उद्या बोईसर पालघर महानगरपालिका होणारच आहे. त्यादृष्टीने आतापासून भविष्याचा विचार करून त्या कार्यालयांच्या जागा आरक्षित केले असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.नवनगरमध्येही बीकेसी उभारणार मुंबईच्या बीकेसी प्रमाणे येथेही सेंट्रल बिसनेस डिस्ट्रिक्ट हब करावयाचे असल्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखिवला.जिल्हा न्यायालय स्थापन झाल्यानंतर कारागृहाच्या प्रश्नाविषयी बोलताना त्यांनी त्यासाठी जागा आरक्षित करणार असल्याचेही सांगितले.या प्रकल्पाच्या बांधकामासाठी अणुऊर्जा केंद्राच्या निकषांची गरज असली तरी आज दोन किंवा तीन मजली इमारतीचं उभ्या राहतील मात्र भविष्यात पुढे वाढीव परवानगी मिळाली तर त्यासाठी या इमारतीचा पाया हा त्यानुसार करून ठेवणार असल्याचे आराखड्यात नमूद असल्याचे ते म्हणाले.
पालघर मुख्यालय, नवनगरचे काम पावसाळ्यानंतर सुरू
By admin | Published: July 07, 2017 5:49 AM