पालघर : गोरगरिब जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी तिचे आरोग्य चांगले रहावे या उद्देशाने महाराष्ट्रभरात सुरू करण्यात आलेल्या पंडित दीनदयाल स्वास्थ्य महाराष्ट्र अभियानासाठी कोकण विभागातून पालघर जिल्ह्याची निवड झाली असून पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते येथील ग्रामीण रुग्णालयात त्याचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना सवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभियानांतर्गत रुग्णांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत. गोरगरिब जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी प्रत्येक महसूल विभागात एका जिल्ह्यासाठी महत्वाकांक्षी असे हे अभियान राबविण्यात येत आहे. हे उपचार शासनाच्या योजनेअंतर्गत तसेच खाजगी स्वयंसेवी संस्था, विविध खाजगी कंपन्याच्या सीएसआरच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती दिली. सर्वानी सहकार्य करून ही योजना यशस्वी करावी असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले. प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे यांनी या अभियानाची सविस्तर माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा थेतले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषद कृषी सभापती अशोक वडे तसेच रु ग्णालयातील वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.(वार्ताहर)
पालघरात स्वास्थ्य अभियान
By admin | Published: May 03, 2017 5:03 AM