शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पालघर ठरतो आहे, मादक द्रव्यांचे ‘जंक्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:18 AM

तलासरीत ४० कोटीचे उच्च प्रतीचे अफगाणी हेरॉईन पकडल्याने पोलिसांची ही कौतुकास्पद कामिगरी पाहता पालघर हा ‘मादक द्रव्य विरिहत जिल्हा’ करण्याचा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक व्यक्त करीत

हितेन नाईक पालघर: तलासरीत ४० कोटीचे उच्च प्रतीचे अफगाणी हेरॉईन पकडल्याने पोलिसांची ही कौतुकास्पद कामिगरी पाहता पालघर हा ‘मादक द्रव्य विरिहत जिल्हा’ करण्याचा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक व्यक्त करीत असले तरी जिल्ह्यात मागील तीन वर्षात ८०४.१३६ किलोग्राम वजनाचे एमडी, हेरॉईन सारखे मादक द्रव्याचे साठे पकडण्यात आले आहेत. त्यामुळे यामागील तस्करी टोळ्यांची पाळे-मुळे खणून काढण्याचे आव्हान पालघर पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांना पेलावे लागणार आहे.भारतात एनडीपीएस अर्थात नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रोफिक सबस्टन्स अ‍ॅक्ट १९८५ साली अंमलात आला. त्यानुसार अमली पदार्थांचे सेवन करणे, ते बाळगणे, त्याची विक्री, वाहतूक, उत्पादन करणे ह्यास मनाई करण्यात आली असून त्याचा भंग केल्यास कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तरीही या अनैतिक व्यवसायातून मिळणारा रग्गड पैसा कमविण्याच्या लालसेपोटी अमली पदार्थाचा पुरवठा, विक्री व त्याच्या सेवनाचा आलेख पालघर जिल्ह्यात वाढतच चालला असून त्यात वसई तालुका आघाडीवर आहे. तर दुसरीकडे आरडीएक्स सारख्या स्फोटकांचा साठा ही सापडून आल्याने दहशतवादी कारवाया करणाºयांना आता पालघर जिल्हा सोयीचा वाटू लागला की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे. महत्वाचे म्हणजे मुंबई-अहमदाबाद महामार्गा लगत लपवून ठेवलेल्या स्फोटकांचा सुगावा स्थानिक पोलिसांना लागला नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर उभे राहिलेले प्रश्नचिन्ह पोलिसांना आपल्या कामगिरीत वाढ करून पुसावे लागणार आहे.मुंबई-अहमदाबाद महामार्गा लगतच्या आदिवासींच्या मागील काही वर्षात खरेदी करण्यात आलेल्या जमिनी व त्या जमिनीवर उभारण्यात आलेली बेकायदेशीर गुदामे, दुकाने आणि पडीक इमारतीचा वापर आरडीएक्स सारखी स्फोटके आणि अमली पदार्थ बनविण्यासाठी होत आहे. काही जागा, कारखाने भाड्याने घेऊन अमली पदार्थ बनविण्याचे कारखाने वसई, पालघर, बोईसर मध्ये उघडण्यात आले असून पालघर मधील रौफ मजीद लुलानिया सारखा स्थानिक सुशिक्षित तरु ण अल्प काळात पैसे कमवून श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी या व्यवहारात सक्रिय झाला होता. पालघर औद्योगिक वसाहती मधील एका भाड्याने घेतलेल्या कारखान्यात मादक द्रव्य बनविले जात असल्याच्या माहिती वरून रेव्हेन्यू इंटेलिजन्स मुंबई झोनच्या अधिकाºयांनी १९ मार्च रोजी धाड घालून २३८.२० किलो मेफॅड्रीन ड्रग जप्त केले होते. या प्रकरणात भानुदास मोरे उर्फ भावेश पटेल ( रा.विरार) व रौफ लुलानीय (पालघर) या प्रमुख आरोपींना आणि त्यांच्या कडून हा माल खरेदी करणाºया वझुल चौधरी उर्फ पप्पू चौधरी, मनीष रावल यांना अटक करण्यात आली होती. भानुदास मोरे यांच्या विरारच्या फ्लॅट मधून ८.१२६ किलो हशिश ही जप्त करण्यात आले. तर रौफ लूलानिया रहात असलेल्या भागातील एका चिकनच्या दुकानातील फ्रीजमध्ये मेफॅड्रीन ड्रग लपवून ठेवल्याचे ही पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने त्याची जवळीक असलेल्या व कधीकाळी एका राजकीय पक्षाच्या वाहतूक शाखेचा पदाधिकारी असलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून हे ड्रग्ज इतरत्र वितरित किंवा हलविले जात होते का? याचाही शोध मुंबई व पालघर पोलिसानी घेतल्यास अनेक गुपिते बाहेर येण्याची शक्यता आहे.जिल्हा निर्मिती नंतर १३ डिसेंबर २०१४ रोजी एनडीपीएस अ‍ॅक्ट खाली नालासोपारा पोलीस स्टेशन अंतर्गत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला असून सीमांग फर्नांडिस या २७ वर्षीय तरु णास या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती.त्या नंतर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील नालासोपारा, तुळींज, वालीव, वसई तर पालघर, डहाणू तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत गांजा ह्या मादक द्रव्याची विक्री मोठ्या प्रमाणातून होत असल्याचे पकडलेल्या आरोपीच्या माहिती वरून दिसून आले होते. आता पर्यंत ३४ गुन्ह्याद्वारे ६३ आरोपींना अटक करण्यात आली असून १०८.८५२ किलो गांजा, २१.७००किलो इफेड्रीन, २४ किलो ब्राऊन शुगर, ५.२५० किलो हेरॉईन, २४.६९० ग्रॅम आयसोसॅफरॉल, ९१ किलो केटामाईन, ५५३.३०४ किलो मॅथ्याक्यूलीन असा एकूण ८०४.१३६ किलो मादकद्रव्याचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे ४३ कोटी १८ लाख ४९ हजार ९१० रुपये आहे. हा आकडा जिल्हा पोलिसांनी केलेल्या कारवाईत मिळाला असला तरी एटीएस आणि रेव्हेन्यू इंटेलिजन्स मुंबई झोनच्या टीम ने जप्त केलेल्या मादक द्रव्याच्या साठ्याची आकडेवारी यापेक्षा मोठी आहे.या सर्व जप्त केलेल्या मालाची आंतरराष्ट्रीय बाजार पेठेतील मूळ किंमत धरल्यास ती पाच पटीने वाढू शकते. गुजरात राज्यातील दहशतवादी कारवाया विरोधी पथकाने (एटीएस टीमने) वाड्यातील (खानिवडे) एका फार्म हाऊसवर धाड घालून ५५३.३०४ किलो मॅथॉक्यूलोन(एमडी) हे अमली पदार्थ जप्त करून विवेक कुबल, लॉरेन्स सिर्वेल, कालिकाप्रसाद मल्हार, सचिन वर्तक, मोबिन शेख या आरोपींना अटक केली. या बाबत वाडा पोलीस मात्र अनिभज्ञ असल्याने जिल्ह्यातील पोलिसांनी आपल्या खबºयांचे विणलेले जाळे कमकुवत असल्याचे सिद्ध झाले होते. या प्रकरणातील अन्य चार आरोपी अजूनही फरार असून त्यांची लिंक आफ्रिकेच्या सीमेपर्यंत पोहचली असून या मादक द्रव्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे २ हजार ४७५ कोटी इतकी असल्याचे कळते. त्या नंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गा वरील सातीवली जवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका पडीक इमारतीमध्ये अतिरेकी कारवाईत वापरात येणारी व अत्यंत संहारक असलेली आरडीएक्स सारखी स्फोटके मुंबईच्या एटीएस टीमने ताब्यात घेतली. याचीही भनक स्थानिक पोलिसांना खूप उशिराने लागल्याने ह्या कारवाई पासून तत्कालीन पोलीस अधीक्षकांनाही चार हात दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा पालघर पोलीस यंत्रणा किती गाफील रहात आहे हे समोर आले होते.या एकापाठोपाठ घडणार्या घटने नंतर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा खडबडून जागी होऊन मादक द्रव्याची निर्मिती, वाहतूक, विक्री करणाºया टोळ्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. मात्र गांजा विक्र ीच्या गुन्ह्या व्यतिरिक्त इतर महत्वपूर्ण घबाड हाती लागत नसल्याने पोलीस अधीक्षक कार्यालय अस्वस्थ होते.परंतु माणिकपूर पोलिसांनी एफेड्रीन, हेरॉईन, आयसोसॅफरॉल, हशिश व तर उच्च प्रतीच्या केटामाईन सारख्या मादकद्रव्याची विक्री करावयास आलेल्या सर्फराज मेमन, सोहेल मेमन व नायजेरियन नागरिक असलेल्या ऊछेना उकपाबी या आरोपींना २५ सप्टेंबर रोजी अटक करून पहिली मोठी यशस्वी कारवाई करण्यात यश मिळविले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. प्रशांत लांगी यांच्या टीमने वरील आरोपी कडून काढलेल्या महत्वपूर्ण माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोनि.अशोक होनमाने यांच्या टीमने तलासरी जवळील दापचरी दुग्ध प्रकल्पाच्या कृषिक्षेत्रातील भाडेतत्वावरील जागेत छापा घालून ५.२०० किलो अफगाणी हेरॉईन व २४.६९० किलो एमडीएम, एक फॉरच्युनर असा सुमारे ४० कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणातील तीन आरोपी पळून गेले होते.त्यामुळे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे ह्यांनी तलासरीत उगारलेला कारवाईचा बडगा या पुढेही त्यांना उगारावा लागणार असून आपल्याच विभागातील मादक द्रव्याच्या व्यवहाराला छुपा पाठिंबा देणार्याना शोधून त्यांच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारावा लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्याला मादक द्रव्याचे हब बनवित तरु ण पिढी उध्वस्त करणारा हा व्यवसाय वेळीच ठेचायचे काम आता पोलिस अधीक्षक सिंगे व त्यांच्या टीम ला करावे लागणार आहे.दुग्ध प्रकल्पाच्या विस्तीर्ण क्षेत्रात मागील ४-५ वर्षा पासून मादक द्रव्याचा व्यवसाय केला जात असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना देत होते. मात्र पोलिसांच्या हेतुपुरस्कार दुर्लक्षाला काही लोकप्रतिनिधीची असणारी साथ ह्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. तर दुसरीकडे वसईतील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेतील एका पोलीस उपनिरीक्षकांनी अमली पदार्थाच्या पसरणाºया जाळ्या विरोधात आपले वरिष्ठ कारवाई करीत नसल्याने वरिष्ठां कडे तक्र ार केली होती.त्यानंतर या प्रकरणातील दोषींवर कारवाई होण्याऐवजी त्याचीच उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे वसई तालुक्यासह पालघर, डहाणू तालुक्यातील अनेक गावांत मादक द्रव्याचा पुरवठा बिनधास्त सुरू असून सर्वसामान्यांच्या अनेक कुटुंबातील तरुण व अन्य व्यक्त या अमली पदार्थांच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य कायमचे उध्वस्त झाले आहे. हे लक्षात घेऊन पोलीस कारवाई कधी करणार?