शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Palghar Loksabha Bypoll Result 2018 : नरेंद्र-देवेंद्र प्रसन्न; पालघरमध्ये जिंकले भाजपाचे 'राजेंद्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 18:12 IST

काँग्रेसचा हात सोडून भाजपाचं कमळ हाती धरणाऱ्या राजेंद्र गावित यांच्यावर पालघरच्या जनतेनं विश्वास दाखवला. 

पालघर: भाजपानं पालघरचा गड राखला आहे. खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या मतदारसंघात भाजपासमोर शिवसेनेनं आव्हान उभं केलं होतं. मात्र निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडून भाजपाचं कमळ हाती धरणाऱ्या राजेंद्र गावित यांच्यावर पालघरच्या जनतेनं विश्वास दाखवला. गावित यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा 44 हजार 589 मतांनी पराभव केला. यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासह निवडणूक आयोगावर टीका केली आहे. पालघर निवडणुकीत पराभव झाल्याचं जाहीर झालं आहे, पण मी पराभव मान्य करत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर ते पिछाडीवर गेले आणि शिवसेनेचे श्रीनिवास वनगा दुसऱ्या क्रमांकावर आले. मात्र वनगा यांना एकाही फेरीत गावित यांना मागे टाकता आलं नाही. गावित यांना दुपारी एकपर्यंत 2 लाख 37 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली. तर श्रीनिवास वनगा यांना 2 लाख 9 हजार मतं मिळाली. Live Updates:

- शिवसेनेचं पालघरमध्ये काम सुरूच राहील-निवडणूक आयोगाला लोकशाहीची बुज असेल तर पालघरमधल्या प्रकरणाचा छडा लावा. तिथल्या निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करा- उद्धव ठाकरे- भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित ४४ हजार ५८९ मतांनी विजयी

- 23 व्या फेरी अखेर भाजपाच्या राजेंद्र गावित यांच्याकडे 31 हजार 616 मतांची आघाडी

- सतराव्या फेरीनंतरही गावितांची आघाडी कायम; गावितांना 1 लाख 90 हजार 492 मतं, श्रीनिवास वनगा यांना 1 लाख 68 हजार 477 मतं; बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना 1 लाख 42 हजार 350 मतं.

- 16 व्या फेरीनंतर गावित 1 लाख 79 हजार 344 मतांसह आघाडीवर; श्रीनिवास वनगा 1 लाख 56 हजार 757 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर

- पंधराव्या फेरीनंतर राजेंद्र गावित यांच्याकडे 29 हजार 697 मतांची आघाडी

- दहाव्या फेरीनंतरही भाजपाच आघाडीवर; भाजपाच्या गावितांना 1 लाख 13 हजार 183 मतं; श्रीनिवास वनगा यांना 95 हजार 772 मतं, बळीराम जाधव 78 हजार 185 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर.

- नवव्या फेरीनंतर राजेंद्र गावित 1 लाख 2 हजार 154 मतांसह आघाडीवर; चिंतामण वनगा यांना 84 हजार 311 मतं, तर बळीराम जाधव यांना 69,963 मतं

- आठव्या फेरीनंतर राजेंद्र गावित 91 हजार 795 मतांसह आघाडीवर; शिवसेनेचे श्रीनिवास वनगा 73 हजार 387 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर, बळीराम जाधव 62 हजार 187 मतांसह तिसऱ्या स्थानी

- सातव्या फेरीनंतरही राजेंद्र गावित यांची आघाडी कायम; राजेंद्र गावित- 80 हजार 97, श्रीनिवास वनगा- 62 हजार 680, बळीराम जाधव 54 हजार 903

- सहाव्या फेरीनंतर राजेंद्र गावित यांना 67 हजार 975 मतं; श्रीनिवास वनगा 52 हजार 893 मतं, तर बळीराम जाधव यांना 47 हजार 606 मतं

- पाचव्या फेरीनंतरही राजेंद्र गावित आघाडीवर

- चौथ्या फेरी अखेर भाजपाच्या राजेंद्र गावित यांना 79 हजार 376 मतं तर सेनेच्या श्रीनिवास वनगा यांना 60 हजार 913 मतं.- चौथ्या फेरीनंतर बविआचे बळीराम जाधव 63 हजार 360 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर -चौथ्या फेरीनंतर भाजपा 16 हजार 069 मतांनी पुढे

- तिसऱ्या फेरीनंतर भाजपाला 6 हजार 857 मतांची आघाडी

- राजेंद्र गावित (भाजपा) 33464, बळीराम जाधव (बविआ) 26607, श्रीनिवास वनगा (शिवसेना) 26318

- दुसऱ्या फेरीनंतर भाजपा- 23271, बविआ- 18923, शिवसेना- 18505, काँग्रेस- 3422

- दुसऱ्या फेरीनंतर भाजपा साडेचार हजार मतांनी आघाडीवर

- पहिल्या फेरीत राजेंद्र गावित (भाजपा) 11,236, बळीराम जाधव (बविआ) 11090, श्रीनिवास वनगा (शिवसेना) 8190

- राजेंद्र गावित आघाडीवर; बविआचे बळीराम जाधव दुसऱ्या क्रमांकावर

- निवडणूक अधिकारी आणि पत्रकारांमध्ये वादावादी; पहिल्या फेरीनंतरही आकडेवारी जाहीर न केल्यानं हमरीतुमरी

- विक्रमगडमध्ये माकपा उमेदवार पुढे

- पोस्टल मतांमध्ये भाजपा आघाडीवर

- डहाणूमध्ये भाजपाचे राजेंद्र गावित पुढे

- मतमोजणीला सुरुवात

- थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार

- भाजपा, शिवसेनेमध्ये कडवी लढत

 

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस