मनोर : डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात जमावाकडून दोन साधू आणि त्यांच्या कारचालकाच्या झालेल्या हत्याकांडाचे पडसाद देशभरात उमटत आहे. त्या दिवशी जमावासमोर त्या साधूंनी हसत हसत हात जोडून आपणास मारू नका, अशी विनवणी केली, मात्र संतप्त जमावाने त्यांचे काही ऐकले नाही. उलट पोलिसांसमोरच त्यांना ठार केले. याबाबत अस्वस्थ झालेल्या एका अज्ञात कवीने आपले नाव न छापण्याच्या अटीवर एक कविता ‘लोकमत’कडे पाठवली आहे. हा कवी म्हणतो की, ‘मुस्कुराकर देख लिया... शायद वो मान जाते...’त्या दिवशी त्या जमावासमोर त्या महाराजांनी मुस्कुराकर भी देखा, परंतु कोणी मानायला तयार नव्हते. या हत्याकांडाला कुणी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका, हे गैरसमजातून घडलेले हत्याकांड आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. त्या साधूंनी ज्या वेदना सहन केल्या असतील, त्या काळोख्या रात्री ७० वर्षीय वयोवृद्ध महाराज कल्पवृक्षगिरी यांनी ज्या अपेक्षा केल्या होत्या पोलिसांकडून, ते जमावाला विनवणी करीत होते, मात्र त्या वेळी त्यांचे कोणीही काहीही न ऐकता, दयामाया न दाखवता त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवर आधारित ‘मुस्कुराकर देख लिया... शायद वो माफ करते’ या कवितेद्वारे आपल्या भावना मांडण्याचा केलेला हा प्रयत्न केला आहे.डहाणूत जमावाने केलेल्या तिघांच्या हत्येप्रकरणी सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे, तर सर्वत्र टीकेचा भडिमार होत आहे. एका व्यक्तीने मात्र त्या घटनेबद्दल त्याच्या भावना कवितेतून व्यक्त केल्या आहेत.मुस्कुराकर देख लिया शायद वो माफ करते...हात जोड लू शायद वो छोड दे...मृत्यू सामाने है ... डर तो लगना ही है...पर मैं भी बेबस क्या करताजिस वर्दीवाले का हात पकडा थावही अपने कर्तव्य की शपथ से भागने लगे थे...अब मैं करता तो क्या करताखुद को मुस्कुराते हुऐ भिड को समर्पित हो गया...वसुंधरा पर शिश झुकाकरप्रणाम कर के वही धाराशाही हो गया...मौत की प्यासी भीड मुझपरइस कदर बरसी थी,कोई पथ्थर कोई डंडाकोई कुल्हाडी से मार रहा था,और में मन में ही राम राम जप रहा था.मृत्यू मुझे कब उठा ले गईये मुझको भी भ्रांती नही हुआ...मैं तो निकला थामेरे पूज्य गुरू के समाधी के लिएपर आज मैं समाधी बन गया...सबके सामने मैं तमाशा बन गया था...रातभर वहीपर पडा रहा बेबस की तरहा...अब तो प्राण भी नही रहे थे शरीर मे मेरे,रूह ने भी साथ छोड दिया था...शायद कोई मेरा भगवा मुझपर झांके...पर वो भी नशीब नहीं हुआ था...नही कोई एम्बुलन्स आई...१० घंटे बाद एक छोटेसे टेम्पो मेंअसंवेदन अपराधी से भी बत्तर अवस्था मेंमुझे उठाकर उल्टा सिधा तीनों शव के साथहमारी यात्रा समाप्त हुई....
Palghar Mob Lynching: मुस्कुराकर देख लिया... शायद वो मान जाते!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 12:02 AM