शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

यंदा पालघर तालुक्यात सर्वाधिक तर मोखाडामध्ये सर्वांत कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 12:38 AM

Palghar Rain News : यंदा सरासरी पाऊस कमी झाला तरी २०२० मध्ये सर्वांत जास्त पाऊस पालघर तालुक्यात २७८६.१० मिमी तर सर्वांत कमी पाऊस मोखाडा तालुक्यात १८३१.१० मिमी पडला आहे.

- हितेन नाईक  पालघर - यंदा सरासरी पाऊस कमी झाला तरी २०२० मध्ये सर्वांत जास्त पाऊस पालघर तालुक्यात २७८६.१० मिमी तर सर्वांत कमी पाऊस मोखाडा तालुक्यात १८३१.१० मिमी पडला आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वांत जास्त भूजलसाठा डहाणू तालुक्यात २.२८ मीटर्स इतका आढळला असून सर्वांत कमी जलसाठा वसई तालुक्यात ०.८३ मीटर्स इतका नोंद झाला आहे.  जिल्ह्यात ५५ निरीक्षण विहिरींची निर्मिती वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पालघर यांच्या वतीने करण्यात आली असून विहिरींतील पाणीसाठ्याच्या अनुषंगाने तालुक्याची भूगर्भातील जलसाठ्याची उपलब्धता नोंद केली जाते.  जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील भूजल सर्वेक्षण वर्षातून दोन वेळा म्हणजेच प्रथम पावसाळ्याआधी आणि पावसाळा संपल्यानंतर करण्यात येते. जिल्ह्यात रेनवॉटर हार्वेस्टिंग बाबत लोकांमध्ये मोठी उदासीनता दिसून येते. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी, वसई, पालघर, वाडा औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांत बोअरिंग मारण्यात आले आहेत. त्यामुळे प्रचंड प्रमाणात भूगर्भातून पाण्याचा उपसा सुरू असून दुसरीकडे जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत बांधण्यात आलेल्या बांधकामात पाणीच साठले जात नसल्याने भूजल पातळीत होणारी मोठी घट चिंताजनक ठरत आहे.  

बेसुमार पाणी उपशामुळे भूगर्भातील पातळीत घट  पालघरमध्ये पाणी साठवणीबाबत (रेनवॉटर हार्वेस्टिंग) लोकांमध्ये मोठी उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत असून बेसुमार पाणी उपशामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  

जिल्ह्यामध्ये ८० टक्के पाऊस झाला असला तरी पाण्याच्या उपशामुळे भूजल पातळी खालावत आहे. पाण्याच्या नियोजनाबाबत लोकांमध्ये अजूनही जागरूकता नाही. - प्रमोद पोळ, भूजल अधिकारी.

टॅग्स :Rainपाऊस