पालघर: प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित असलेले प्रश्न आण िग्रामविकास विभागाने काढलेल्या जीआरमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकावर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ ३ नोव्हेंबर ला पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समितीच्या नेतृत्वाखाली १३ संघटनांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी काढलेल्या शासन निर्णयात आवश्यक त्या सुधारणा व दुरु स्त्या करून बदल्या नोव्हेंबर मध्ये न करता त्या मे २०१८ मध्ये कराव्यात, २३आॅक्टोबर रोजीचा निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणीबाबत काढण्यात आलेला अन्यायकारक जी. आर. रद्द करण्यात यावा या प्रमुख मागण्या मोर्चेकºयांच्या आहेत.याशिवाय आॅनलाइन व सर्व अशैक्षणकि कामे बंद करून केंद्र शाळास्तरावर सर्व प्रकारच्या आॅनलाइन कामासाठी संगणक डाटा आॅपरेटरची नेमणूक करण्यात यावी, नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, त्यांची नवीन पेन्शन योजना तत्काळ बंद करण्यात यावी, एमएससीआयटी परीक्षेसाठी मुदतवाढ देण्यातयावी, जिल्हा नवीन असल्याने जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षकांची १० वर्षे सेवा न झाल्यामुळे फक्त रिक्त पदावर बदली करावी इ. प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्राथमिक शिक्षकांच्या सर्व संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.शासन रोज वेगवेगळे जी.आर. काढून शिक्षकांचे खच्चीकरण करीत आहे.त्याला वेळीच वेसण घालण्याचे काम आपणास करावयाचे आहे.त्यामुळे या मोर्चामध्ये हजारो संख्येने उपस्थित रहावे.-प्रदीप पाटील, समन्वय समिती सदस्य व शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष
पालघरला शिक्षकांचा शुक्रवारी मोर्चा निघणार; ‘ते’ जी.आर. रद्द करा, मागण्या मान्य करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 4:04 AM