शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
3
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
4
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
5
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
6
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
7
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
8
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
9
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
10
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
11
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
12
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
13
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
14
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
15
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
16
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
17
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
18
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

पालघरची वाहतूककोंडी आजपासून फुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 12:47 AM

बेशिस्त वाहनचालक, विक्रेत्यांवर होणार कारवाई : बैठक नावापुरती ठरू नये अशी नागरिकांची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : पालघर शहराच्या मागील २५ वर्षांपासून कळीचा मुद्दा ठरलेल्या वाहतूककोंडीच्या सोडवणुकीसाठी शहरात गुरुवारपासून कडक अंमलबजावणी करण्याची घोषणा पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी केली आहे. मात्र, या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर मागील २० वर्षांपासून झालेल्या बैठकीप्रमाणेच ही बैठकही नावापुरती ठरू नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

पालघरमधील वाहतूककोंडीच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आतापर्यंत १२ ते १५ वेळा नगर परिषद, लोकप्रतिनिधी, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसटी विभाग, रिक्षा युनियन, व्यापारी संघटना आदींमध्ये बैठका पार पडल्यानंतर आजही हा प्रश्न सुटलेला नाही. वाढते नागरिकीकरण आणि जिल्हा निर्मितीनंतर शहरावर वाहनांचा वाढता भार यामुळे वाहतूककोंडीच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे. पालघर-माहीम रोड, पालघर-मनोर रोड या दोन रस्त्यांवर प्रचंड वाहतूककोंडी होत असून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन, सहा आसनी रिक्षा, मोटारसायकली, चायनीज-वडे विक्रेत्यांच्या हातगाड्या, भाजी विक्रेते, मासे विक्रेते आदींमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी बुधवारी पालघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे, मुख्याधिकारी स्वा ठरणाऱ्या बाबींविरोधात कडक कारवाईला सुरुवात होणार असल्याची घोषणा पोलीस अधीक्षक शिंदे यांनी केली. 

रेल्वेस्थानकाजवळील पोलीस चौकी आणि हुतात्मा स्तंभ येथील विद्युतखांब काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कचेरी रस्त्याकडे जाणारी, देवीसहाय रस्त्याकडे जाणारी आणि कचेरी रस्त्यावरून माहीम रस्त्याकडे जाणारी वाहने टर्न फ्री करण्यात आली आहेत.  

१०० मीटर्स अंतरापर्यंत वाहनांच्या पार्किंगला बंदी माहीम व मनोर या प्रमुख मार्गांवर १०० मीटर्स अंतरापर्यंत वाहनांच्या पार्किंगला बंदी घालण्यात आली असून संपूर्ण परिसर ‘ना फेरीवाला क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे. इतर फळे, फुले, भाजीपाला विक्रीसही बंदी घालण्यात आली आहे. रस्त्यावर बसणाऱ्या फळ, भाजीपाला, मासे विक्रेत्यांना पूर्वेला अथवा कचेरी रोड, लोकमान्यनगर येथील मोकळ्या जागेत बसण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर