पालघर - सागरी, नागरी व डोंगरी अशा वैविध्यपूर्ण भौगोलिक रचनेच्या जिल्ह्यात सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून शाश्वत आणि नियोजनबद्ध पद्धतीने विकास सुरू आहे. यामुळे आपला जिल्हा लवकरच प्रगतीशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल. शासन आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तसेच जनसहभाग यामुळेच हे साध्य होणार आहे. सर्वांनी मिळून एकत्रितपणे जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देऊ या, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात गुरूवारी ध्वजारोहण करण्यात आले.केंद्र सरकारने काश्मीरबाबत ३७० आणि ३५ ए हे कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी पालघरच्या जनतेच्या वतीने त्यांचे मन:पूर्वक धन्यवाद व्यक्त केले. यावेळी स्वातंत्र्य सैनिक, खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, माविमच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक गौरव सिंग, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी, नागरीक उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, जिल्ह्यात सरासरी २४५१.१५ (१४१.९ टक्के) मिमी पावसाची नोंद झाल्याने सर्व धरणांमध्ये मुबलक पाणी साठा आहे. ३ व ४ आॅगस्ट या कालावधीतील अतिवृष्टीमूळे पुरात अडकलेल्या वसई, वाडा व पालघर तालुक्यातील ८०५ लोकांची सुटका करण्यात आली असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडकलेल्या व्यक्तींची सुटका करण्यासाठी एनडीआरएफ, भारतीय तट रक्षक दल, जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणा व स्थनिकांनी मोलाची मदत केल्याने त्यांचे आभार व्यक्त केले.पुरपरिस्थिती मुळे मयत झालेल्या व्यक्तींना ४८ लाखाची मदत देण्यात आली असून मृत जनावरांच्या मालकांना नुकसानीपोटी १ लाख ९८ हजार रुपये, तर पावसाळ्यात पडझड झालेल्या ६०० घरांना ३३ लाख ५६ हजार रु पये मदत देण्यात आल्याचेही ते म्हणाले. अतिवृष्टीमुळे बाधीत ३ हजार २८० कुटूबांना प्रत्येकी १० किलो तांदूळ, गहु व ५ लिटर केरोसीनची मदत देण्यात आली आहे. तसेच पिकांचे नुकसानीच्या पंचनाम्याचे काम प्राधान्याने पूर्ण करु न घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील कुपोषण व बालमृत्यू कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष टास्क फोर्सच्या माध्यामातून केलेल्या कामामुळे यंदा कुपोषित बालकांची संख्या घटली असल्याचेही पालकमंत्री चव्हाण यांनी यावेळी सांगितले.विविध पुरस्कारांचे वितरणविविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या कामिगरीबद्दल विशेष सेवा पदक मंजूर करण्यात आलेले आहे. यामध्ये विलास सखाराम सुपे, पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा, सुधीर तात्या कटारे, पोलीस उपनिरीक्षक, कासा. पो. स्टे., अजित सदाशिव काणसे, पोलीस उपनिरीक्षक तलासरी पो. स्टे., जयेश आनंदा खदरकर, पोलीस उपनिरीक्षक विरार पो. स्टे., महेश भिमराव गावडे, पोलीस उपनिरीक्षक तलासरी पो. स्टे, प्रमोद बळीराम बनकर, पोलीस उपनिरीक्षक विरार पो.स्टे., मल्हार धनराज थोरात, पोलीस उपनिरीक्षक तुळींज पो.स्टे., नितिन नारायण कोळी, आदी.
प्रगतीशील जिल्हा म्हणून लवकरच पालघरची ओळख, पालकमंत्र्यांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 12:09 AM